‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’

निफाड तालुक्यातील रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंबंधी शासन स्तरावर संपूर्ण कार्यवाही व प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह ‘रासका’ कृती समिती आमरण उपोषण करेल.
Start ‘Rasaka’, otherwise fast ’
Start ‘Rasaka’, otherwise fast ’

नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होत आहे. तरी निफाड तालुक्यातील रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंबंधी शासन स्तरावर संपूर्ण कार्यवाही व प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून आमचा हंगाम वाया जाणार नाही, अन्यथा आपल्या कार्यालयात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह ‘रासका’ कृती समिती आमरण उपोषण करेल, असा इशारा निफाड उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांना कृती समितीने निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, निफाड तालुक्यातील उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यंदाच्या हंगामात तरी रानवड सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा. यासाठी आम्ही कृती समितीच्या वतीने तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींना भेटी देऊन परिस्थितीचं गांभीर्य सांगितले.

यासह खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांना याबाबत निवेदनाद्वारे कृती समितीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे परंतु हंगाम तोंडावर आला असताना ‘रासाका’ सुरू होण्यासाठी अजूनही कुठली पावले उचलली गेली असे दिसत नाही म्हणून कृती समितीने आक्रमक भूमिका घेत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे, दत्तू मुरकुटे, बाबुराव सानप, वैभव कापसे, भरत आव्हाड, सचिन वाघ, हेमंत सानप, अनिल शिंदे, आशुतोष काळे, सुयोग गिते, मनोज जाधव, दीपक गोडबोले, आनंदा मोगल, महेश रोटे, वैभव तासकर आणि कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

रानवड सहकारी साखर कारखाना तातडीने सुरू व्हावा निफाड तालुक्यातील ऊस उत्पादकांची होणारी होरपळ थांबली पाहिजे. यासाठी शासनाने तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन हंगाम सुरू होण्यासाठी शासनास भाग पाडले पाहिजे. अन्यथा आम्हाला प्रांत कार्यालयात उपोषण करावा लागेल. -बाबुराव सानप, शेतकरी, सोनेवाडी, ता. निफाड  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com