मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार : सामंत

नाशिक: ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू होते. परंतु, मधल्या कालखंडात 'युजीसी'ने त्यांना तांत्रिक कारणास्तव सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली नाही.
To start agricultural courses in open university: Samant
To start agricultural courses in open university: Samant

नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू होते. परंतु, मधल्या कालखंडात 'युजीसी'ने त्यांना तांत्रिक कारणास्तव सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली नाही. परंतु, विद्यापीठाने यापूर्वी त्या अभ्यासक्रमांद्वारे सुरू केलेले कृषी विज्ञान केंद्र, त्या माध्यमातून यशस्वी केलेले प्रयोग पाहता शासनातर्फे काही अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे’’, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण माहाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सभागृहात परिक्षांबाबत रविवारी (ता.२०) आयोजित आढावा बैठकीत सामंत बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय्, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन खताळ, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश बोंडे उपस्थित होते.

सामंत म्हणाले, ‘‘जुन्या कृषी अभ्यासक्रमांना केंद्र सरकारद्वारे मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. विद्यापीठाने आपल्याकडील मुदत ठेवींद्वारे विद्यार्थी कल्याण तसेच विद्यापीठाच्या विस्तारीकरणाचा विचार करावा. त्यासाठी शासनाशी समन्वय वाढवावा. राज्यात अंतीम परिक्षा घ्याव्या. त्याचे स्वरूप विद्यापीठांनी निश्चित करावयाचे असल्याने त्यांना शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.’’

‘‘राज्यभरात विद्यापीठांना भेटी देवून त्यांच्या परिक्षा पद्धतीची रूपरेषा, पूर्वतयारी व परिक्षांच्या नियोजनात शासनाचा सहभाग यांची सांगड महत्वाची आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे अंतीम वर्षात शिक्षण घेत असलेल्या १ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येईल. त्यासाठी विद्यापीठाला शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’’

कोरोना काळात घेतल्या जाणारे कुठलेही गुणपत्रक अथवा पदवी प्रमाणपत्र कोरोना कालखंडातील म्हणून बाधित केले जाणार नाही. अथवा, त्यावर कुठलाही तशाप्रकारचा उल्लेख केला जाणार नाही. नियमित परिक्षांच्या गुणपत्रक व प्रमाणपत्राप्रमाणे ते असतील. त्याबात राज्यस्तरावरून व्यापक जागृती व प्रसिद्धी मोहिम राबवावी, असे सामंत म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com