agriculture news in marathi Start the auction work Government issues order to Nashik APMCs | Agrowon

लिलाव सुरू करा; नाशिकला बाजार समित्यांना आदेश

ॲग्रोवन वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

बाजार समित्या कामकाज सुरू करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सतीष खरे यांनी जिल्ह्यातील बाजार समित्यांना दिले आहेत.  

नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या मार्चअखेर, होळी आणि शासकीय सुट्ट्या अशी विविध कारणे देत बंद आहेत. परिणामी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यावर ॲग्रोवनने ‘पंधरा लाख क्विंटल कांदा तुंबला’  या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. यावर बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून न घेतल्याबाबत भूमिका मांडण्यात आली होती. या वृत्ताचा आधार घेत बाजार समित्या कामकाज सुरू करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सतीष खरे यांनी जिल्ह्यातील बाजार समित्यांना दिले आहेत.  

दहा दिवस बाजार समित्या बंद असल्याने जिल्ह्यातील १५ लाख क्विंटल कांदा विक्रीविना पडून राहिला आहे. परिणामी, जिल्ह्यात होणारे १३५ कोटींची उलाढाल ठप्प झाल्याबाबत वृत्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने याबाबत जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांना पत्र काढले आहे. बाजार समित्यांमध्ये २७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान व्यापारी वर्गाच्या विनंती अर्जानुसार लिलावाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी वर्गाकडे होळी सणामुळे मजूर उपलब्ध होणार नसल्याने तसेच सार्वजनिक सुट्टी व मार्च अखेरमुळे बँका बंद राहणार असल्याने लिलावाचे कामकाज राहणार असल्याचे कारण देण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नियमानुसार सार्वजनिक सुट्ट्या वगळता इतर दिवशी बाजार आवारातील शेतीमाल लिलावाचे कामकाज सुरळीत चालू ठेवा. शेतीमाल उत्पादक, व्यापारी व ग्राहक यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बाजार समितीचे स्तरावरून उचित कार्यवाही करा. बाजार समिती आवारावर शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणल्यास लिलाव करून माल खरेदी करण्याची आवश्यक ती व्यवस्था करावी तसेच बाजार समिती आवारावर शेतीमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

फायदा होणार कसा? 
शेतीमाल लिलाव करून माल खरेदी करण्याची आवश्यक ती व्यवस्था करावी तसेच बाजार समिती आवारात शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांची दक्षता घ्या असे आदेश देण्यात आले. मात्र अनेक बाजार समित्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालय व पणन मंडळास बाजार कामकाज बंद ठेवण्याबाबत कळविलेले नाही. मात्र शेतकऱ्यांना कळविले आहे. त्यामुळे बंदबाबत बाजार समितीकडून जाहीर करण्यात आल्याने आवक होणार नाही. मग या पत्राचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे बाजार समित्या आदेश पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...
तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा...
हापूसच्या ४० हजार पेट्या थेट...रत्नागिरी ः उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी...
कडधान्य उत्पादनात ६५ टक्के वाढ पुणे ः देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...