रोजगारासाठी उद्योगधंदे सुरू करा ः नाना पटोले 

भंडारा ः टाळेबंदीमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नव्या अधिसूचनेनुसार टाळेबंदी शिथिल करून रोजगारासाठी जिल्ह्यातील लहानमोठे उद्योग सुरू करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
Start a business for employment: Nana Patole
Start a business for employment: Nana Patole

भंडारा ः टाळेबंदीमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नव्या अधिसूचनेनुसार टाळेबंदी शिथिल करून रोजगारासाठी जिल्ह्यातील लहानमोठे उद्योग सुरू करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवडे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. 

नाना पटोले म्हणाले की, परराज्यातील तसेच महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील नागरिक भंडारा जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्याची सोय शासनातर्फे करण्यात येत आहे. परंतु काही जिल्ह्याच्या बाबतीत त्यांनी पाठविलेले व्यक्‍ती प्रवास करून गेल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशा परिस्थितीत काळजी घेण्याची गरज असून प्रत्येक व्यक्‍तीची वैद्यकीय तपासणी आवश्‍यक आहे. कोविड-१९ ची लक्षणे नाहीत, अशा आशयाचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे. 

नागपूरला कोविड रुग्णालय  दररोज तीन हजार कोविड-१९ सशंयितांची तपासणी करता येईल, अशाप्रकारची सुविधा असलेले रुग्णालय नागपूर येथे लवकरच होणार आहे. कोरोनाच्या समुळ उच्चाटनासाठी याचा उपयोग होईल, असेही नाना पटोले यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com