परळी झोनमधील कापूस खरेदी सुरू करा ः पंकजा मुंडे

Start buying cotton in Parali Zone: Pankaja Munde
Start buying cotton in Parali Zone: Pankaja Munde

नागपूर  ः बीड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची खरेदी बंद झाली आहे. परिणामी, खुल्या बाजारात व्यापाऱ्यांनी कमी दराने कापूस खरेदीचा सपाटा लावल्याने कापूस उत्पादकांसमोरील आर्थिक संकट गडद झाले आहे. त्याची दखल घेत खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी माजी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.  

मराठवाड्यात कापसाखालील क्षेत्र नजीकच्या काळात वाढीस लागले आहे. कापसाला यावर्षी ५५५० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने परळी वैजनाथ झोनमध्ये २३ केंद्राच्या माध्यमातून खरेदी सुरू केली होती. सीसीआयचे देखील या भागात दोन केंद्र आहेत. परळी झोनमध्येच बीड जिल्ह्याचा समावेश होतो. परंतु, कापूस साठवणुकीचा प्रश्‍न निर्माण झाल्याने सोमवार (ता. २०) पासून बीड जिल्ह्यातील २४ केंद्रांवरील खरेदी बंद करण्यात आली. पणनकडून हमीभाव ५५५० रुपयाने खरेदी सुरू असल्याने खुल्या बाजारात कापसाचे दर ४९०० ते ५३०० रुपयांवर पोचले होते. परंतु, पणनची खरेदी बंद होताच हे दर खाली आले आहे.

व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादकांची लुट करण्याचे षड्‌यंत्रच या माध्यमातून रचले गेले आहे. त्याची दखल घेत कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील २४ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू करण्यात यावी,’’ अशी मागणी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

उत्पादकता कमी संततधार पावसामुळे आधीच कापसाची उत्पादकता कमी होत प्रतही खालावली आहे. अशातच शासकीय खरेदी केंद्र बंद झाल्याने कापूस उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com