कारंजा बाजार समितीत हळद खरेदी सुरू

कारंजा बाजार समितीत हळद खरेदी सुरू
कारंजा बाजार समितीत हळद खरेदी सुरू

कारंजालाड, जि. वाशीम : कारंजा तालुक्यासह परिसरात हळदीची लागवड वाढत असतानाच विक्रीची सोय नसल्याने शेतकऱ्यांना मराठवाड्यातील बाजार समित्यांवर अवलंबून राहावे लागत होते. शेतकऱ्यांची ही अडचण पाहता कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके व संचालक मंडळाने पुढाकार घेत खरेदी सुरू केली. हळद खरेदी लिलाव ३० मेपासून सुरू करण्यात आले आहेत. हळद खरेदीला श्री. डहाके यांच्या हस्ते सुरवात करण्यात आला. शेतमाल विक्रीस आणणारे प्रथम शेतकरी ज्ञानेश्वर गुलाब चव्हाण, गौळ यांचा बाजार समितीच्यावतीने सभापती प्रकाश डहाके यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात  आला. हळद विक्रीसाठी आणणाऱ्या ३६ शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. हळदीचे बाजारभाव ५५०० पासून ६४५५ पर्यंत होते. याप्रसंगी बाजार समिती संचालक सुरेश पाटील दहातोंडे, अरुण पाटील वानखडे, प्रवीण पाटील वानखडे, बाळकृष्ण ढोरे, संतोष गोडसे, ब्रिजमोहन मालपाणी, दीपक पापडे, हसन चौधरी, जगदेवराव पाटील तसेच असंख्य शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, मापारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सचिव नीलेश भाकरे, सहायक सचिव किशोर शिंदे, किरण देशमुख, देवेद्र पाटील कडू, दत्ता मते यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com