मानवत बाजार समितीत हळद खरेदी सुरू

मानवत बाजार समितीत हळद खरेदी सुरू
मानवत बाजार समितीत हळद खरेदी सुरू

मानवत, जि. परभणी : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डावर मंगळवारी (ता. ७) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रथमच जाहीर लिलाव पद्धतीने हळद खरेदी सुरू करण्यात आली. मुहूर्तावर सुमारे १ हजार क्विंटल हळदीची आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ५३८० ते  ६२७५ रुपये दर मिळाले.

गेल्या दोन-तीन वर्षात मानवत तालुक्यासह शेजारील तालुक्यात हळद लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मानवत बाजार समितीत हळद खरेदी केली जात नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यातील बाजारपेठेत ती विक्रीस न्यावी लागत होती. वाहतूक खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना जवळची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून संचालक अनंत गोलाईत यांनी मानवत बाजार समितीत हळद खरेदी सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बाजार समितीने ठराव घेऊन मंगळवारी (ता. ७) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर लिलावाद्वारे खरदी सुरू केली.

पहिल्याच दिवशी हळदीची १ हजार क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल किमान ५ हजार ३८० ते कमाल ६ हजार २७५ रुपये दर मिळाले. यावेळी हळद उत्पादक शेतकरी शिवाजी झाकणे, संजय गिरी, भागवत राठोड, रामप्रसाद चापके, कल्याणराव सवणे, राजेभाऊ कदम, सचिन कदम यांचा बाजार समितीतर्फे सत्कार करण्यात आला. बाजार समितीचे सभापती गंगाधरराव कदम, उपसभापती पंकज आंबेगावकर, सचिव शिवनारायण सारडा, सहकार अधिकारी जे. बी. भालेराव, संचालक माणिक काळे, बाबासाहेब आवचार, ज्ञानेश्वर मोरे, सोपान वाघमारे, अनंत गोलाईत, गिरीश कत्रुवार, श्रीकिशन सारडा, राजाराम मोरे, संजय लड्डा, आश्रोबा कुऱ्हाडे, संजय यादव, महेश कोक्कर, प्रभाकर कदम, पंकज लाहोटी, गणेश मोरे उपस्थित होते. 

हळद लिलाव प्रक्रियेत वसमत येथील व्यापारी लक्ष्मीनारायण मुरक्या, नितीन लाहोटी, सुरेंद्र तोष्णीवाल, राहूल कडतन, जुगलकीशोर काबरा, राजू काबरा सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com