जळगाव जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करा

जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करा
जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करा

चोपडा : जिल्ह्यात गंभीर दुष्काळ जाहीर झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी आहेत. पशुधनासाठी चार छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली असून, त्यांनी शुक्रवारी (ता.२) येथे धरणे आंदोलन केले. नायब तहसीलदार डॉ. स्वप्नील सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.

शिवाजी चौकात दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत धरणे आंदोलन केले. निवेदनात म्हटले आहे, की राज्यात भाजपच्या राज्य व केंद्रशासनाने निवडणुकीत जनतेला दिलेले आश्वासन पूर्णपणे फसवे आहेत. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे व समस्यांकडे फारसे गांभीर्याने लक्ष न देता बहुमताच्या आविर्भावात शासन वागत आहे. शासनाने तत्काळ चारा छावण्या सुरू करून जनावरांना मृत्यूमुखी पडल्या पासून वाचविण्याच्या संदर्भात त्वरित पावले उचलावीत या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

 मागील वर्षी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना कापूस उत्पादनात फार मोठी घट आली आहे. शासनाने जाहीर केलेल्या बोंडअळीची नुकसानभरपाई मागूनही वारंवार निवेदने देऊनही आंदोलने निदर्शने करूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाही. पीकविम्याची रक्कमही जमा करण्यात आलेली नाही. शासनाने जाहीर केलेली तत्काळ मदत दहा हजार रुपयेही आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांवर मिळालेली नाही. शासन शेतकऱ्यांना विरोधी वागणूक देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, उपनगराध्यक्षा सुप्रिया सनेर, नंदकिशोर सांगोरे, बी. एम. पाटील, राजेंद्र पाटील, अशोक साळुंखे, संजीव बाविस्कर, नगरसेविका सुरेखा माळी, रमेश शिंदे, किरण सोनवणे, विनायक सोनवणे, शशिकांत साळुंखे, देवकांत चौधरी, ॲड. संदेश जैन, अनिल पाटील, मोहन पाटील, सुरेश धनगर, प्रबळ धनगर, जगदीश पाटील, विश्वनाथ माने पाटील, अनिल चौधरी, लोटन पाटील, उज्ज्वल शिंदे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com