लोणार तालुक्‍यात चारा छावण्या सुरू करा
लोणार तालुक्‍यात चारा छावण्या सुरू करा

लोणार तालुक्‍यात चारा छावण्या सुरू करा

चारा छावण्या सुरू करण्याची मागणी दुसऱ्यांदा प्रशासनाकडे केली आहे. येत्या १५ दिवसांत याबाबत अंमलबजावणी न केल्यास शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. पाणीटंचाईमुळे शेतकरी संकटात अाहे. अशा स्थितीत या मागणीकडे प्रशासनाने संवेदनशीलपणे पाहावे. - बबनराव वायाळ, शेतकरी, खळेगाव.

बुलडाणा  : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांना चारा आणि पाण्याबाबत मोठ्या अडचणी येत आहेत. दर दिवसाला टँकरची मागणी वाढत आहे. सोबतच आता चारा छावण्यांसाठीही शेतकरी आग्रह करू लागले आहेत. लोणार तालुक्‍यात तातडीने चारा छावणी सुरू करण्याची मागणी खळेगाव येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली. गावकऱ्यांनी तहसीलदार, पंचायत समिती अधिकाऱ्यांना भेटून या मागणीबाबत चर्चा केली. 

लोणार तालुक्‍यातील खळेगाव येथील शेतकरी बबनराव धोंडूजी वायाळ व इतर इतर शेतकऱ्यांनी यापूर्वीच तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती पाहता चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली होती. २७ नोव्हेंबर २०१८ पासून ते तहसील, पंचायत समिती, कृषी विभाग तसेच पशुसंवर्धन विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु, आजपर्यंत शेतकऱ्यांच्या मागणीची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. प्रशासन कोणतीही उपाययोजना करीत नसल्यामुळे पुन्हा एकदा बबनराव वायाळ व शेतकरी तहसील कार्यालयावर जात दुसऱ्यांदा मागणी केली. त्यांनी तत्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.

या परिसरातील शेतकरी मागील तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहेत. नापिकीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले. जनावरे पाळणे अडचणीचे आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी त्यांची विक्री सुरू केली आहे. जनावरांना दरसुद्धा कमी मिळत आहेत. निवेदन देताना बबनराव वायाळ, सुभाषराव सानप, प्रताप सानप, दिलीप वायाळ, गजानन वायाळ, दत्तू वायाळ, लक्ष्मण ढसाळ, पांडू सानप, कारभारी मुंढे, मधुकर सानप, राजू नागरे, रमेश वायाळ, डॉ. प्रशांत वायाळ, विजय वायाळ, धोंडू सानप, तेजराव वायाळ, गणेश बोटुळे, दशरथ डोईफोडे, बाळू वायाळ, विठ्ठल मुंढे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com