बाजरीची शासकीय खरेदी सुरू करा, खानदेशातील शेतकऱ्यांची मागणी

जळगाव : खानदेशातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची आवक कमी असली, तरी देखील दर दबावात आहेत. सध्या किमान १५५० व कमाल १७५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शासकीय खरेदी सुरू करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
Start government procurement of millets, Demand of farmers in Khandesh

धुळे, शिंदखेडा, जळगावमधील चाळीसगाव, भडगाव, जामनेर या भागात बाजरीचे उत्पादन अधिक घेतले जाते. मागील वर्षी बाजरीचे दर प्रतिक्विंटल २२०० रुपयांपर्यंत होते. दर बऱ्यापैकी असल्याने शेतकऱ्यांना पीक परवडले होते. परंतु, यंदा दर सुरवातीपासून कमीच आहेत. सुरवातीला १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. नंतर दरात घसरण सुरू झाली. कोविड-१९ मुळे सर्वत्र बाजार समित्या विस्कळीत झाल्या. शेतकऱ्यांना त्याचा तोटा होत आहे. 

सध्या धुळे, दोंडाईचा (ता.शिंदखेडा), जळगाव, चोपडा, अमळनेर येथील बाजार समितीमध्ये बाजरीची आवक सुरू आहे. जळगाव, चोपडा येथील बाजारातील आवक मागील आठवड्यात निम्म्याने कमी झाली आहे. तरीही दरात सुधारणा झालेली नाही. या आठवड्यात खानदेशातील बाजार समित्यांमध्ये रोज सरासरी मिळून अडीच हजार क्विंटल बाजरीची आवक झाली आहे. आवक कमी असताना दरात सुधारणा होत नसल्याने बाजरीचीदेखील शासकीय खरेदी सुरू करावी. हमीभाव द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com