जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी केंद्रे सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी

जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू करावी, अन्यथा आंदोलन उभे करू, असा इशारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांनी दिला.
 Start maize and sorghum procurement centers in Jalgaon district, demand of farmers
Start maize and sorghum procurement centers in Jalgaon district, demand of farmers

जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू करावी, अन्यथा आंदोलन उभे करू, असा इशारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांनी दिला. अनेक शेतकऱ्यांचा मका विक्रीविना घरात पडून आहे. तो शेतकरी कुठे विक्री करतील, असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात आला.

जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे शासकीय खरेदी केंद्रे वेळेत व सुरळीत सुरू नसल्याने नुकसान झाले आहे. आता निम्म्या शेतकऱ्यांचा मका घरात पडून आहे. त्यात आणखी नुकसान होईल. शासकीय खरेदी तातडीने सुरू करण्याची गरज आहे. ही खरेदी सुरू न केल्यास येत्या ५ तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करू, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार व धरणगाव तालुका शेतकरी खरेदी, विक्री संघाने दिला आहे. 

जून महिन्याच्या सुरवातीला ज्वारी, मका खरेदी केंद्रे शासनाने सुरू केली. परंतु, लागलीच काही दिवसांत खरेदी बंद झाली. केंद्र सुरळीत सुरूच नव्हते. अनेकदा पावसाचे कारण दिले जायचे. अनेक शेतकऱ्यांचा मका, ज्वारी घरात पडून आहे. त्याची विक्री कुठे करायची, असा प्रश्‍न आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २० हजार शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रात मका विक्रीसाठी नोंदणी केली होती. परंतु, फक्त चार हजार शेतकऱ्यांच्या मक्याची खरेदी झाली आहे. मका, ज्वारीचे बाजारातील दर कमी आहेत. त्याची विक्री कुठे करावी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com