मका खरेदी तातडीने सुरू करा

मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून मक्‍याची नोंदणी झाली असून अद्यापही मका खरेदी सुरू झाली नाही.
maize
maize

बुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून मक्‍याची नोंदणी झाली असून अद्यापही मका खरेदी सुरू झाली नाही. मका खरेदी तत्काळ सुरू करावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल खाकरे पाटील यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. एक) तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

यात म्हटले की, मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून मक्‍याची नोंदणी झाली आहे. परंतु अद्याप मका खरेदीला सुरवात झाली नाही. पेरणीचे दिवस सुरू झाले असून, शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्याचे आदेश दिले असताना येथे अजूनही खरेदी सुरू झाली नाही. मका खरेदी तत्काळ सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. सध्या पीककर्ज वाटपाची लगबग सुरू आहे. परंतु काही बॅंकांचे अधिकारी शेतकऱ्यांना विनाकारण फेरफार, प्रतिज्ञालेख अशा कागदपत्रांची मागणी करीत आहेत. संबंधित बॅंकांना तातडीने निर्देश देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.  निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल खाकरे-पाटील, कैलास गवई, महेंद्र गवई, गणेशसिंग राजपूत, सोपान धोरण, नितीन राजसिंह, नानाभाऊ देशमुख, विजय खोंदले, रामेश्वर गायकवाड, अ.जमील, शंकर नारखेडे, संतोष मेढे, संजय जवरे, किशोर पाटील, उखा चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com