agriculture news in Marathi start maize procurement immediately Maharashtra | Agrowon

मका खरेदी तातडीने सुरू करा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून मक्‍याची नोंदणी झाली असून अद्यापही मका खरेदी सुरू झाली नाही.

बुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून मक्‍याची नोंदणी झाली असून अद्यापही मका खरेदी सुरू झाली नाही. मका खरेदी तत्काळ सुरू करावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल खाकरे पाटील यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. एक) तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

यात म्हटले की, मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून मक्‍याची नोंदणी झाली आहे. परंतु अद्याप मका खरेदीला सुरवात झाली नाही. पेरणीचे दिवस सुरू झाले असून, शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्याचे आदेश दिले असताना येथे अजूनही खरेदी सुरू झाली नाही.

मका खरेदी तत्काळ सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. सध्या पीककर्ज वाटपाची लगबग सुरू आहे. परंतु काही बॅंकांचे अधिकारी शेतकऱ्यांना विनाकारण फेरफार, प्रतिज्ञालेख अशा कागदपत्रांची मागणी करीत आहेत. संबंधित बॅंकांना तातडीने निर्देश देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. 

निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल खाकरे-पाटील, कैलास गवई, महेंद्र गवई, गणेशसिंग राजपूत, सोपान धोरण, नितीन राजसिंह, नानाभाऊ देशमुख, विजय खोंदले, रामेश्वर गायकवाड, अ.जमील, शंकर नारखेडे, संतोष मेढे, संजय जवरे, किशोर पाटील, उखा चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...