Agriculture news in marathi Start Moog, Urad Shopping Center in Jat` | Agrowon

`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करा`

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

 जत तालुक्यात तालुक्यात उडीद खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु केली आहे.  परंतु, जत तालुक्यात सर्वाधिक उडदाचे क्षेत्र आहे. हमीभावाने उडीद विक्री करायची झाल्यास १०० ते १५० किलोमीटरचा पल्ला गाठून सांगली येथे यावे लागते. दरवर्षी खरेदीकेंद्र सुरु करावे, अशी मागणी केली जाते. परंति, आमच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे यंदा तरी जत तालुक्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरु करणार का? असा प्रश्न उडीद उत्पादकांनी उपस्थित केला. तालुक्यात उडीद खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

जिल्ह्यात यंदा उडदाचा १७ हजार ०५८ हेक्टरवर पेरा झाला आहे. यंदा उडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. जत तालुक्यात उन्हाळी पाऊस अपेक्षित झाला. त्यानंतर पिकास उपयुक्त वातावरण मिळाले. यामुळे उडीद पिक चांगले वाढले. तालुक्यात उडदाचे सरासरी क्षेत्र २१५१ हेक्टर असून ६ हजार ५९४ हेक्टरवर पेरा झाला आहे. 

सध्या उडीद हमीभावाने खरेदीसाठी १५ सप्टेंबरपासून नोंदणी सुरु केली आहे. सांगली येथील खरेदी केंद्रात येऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. सांगलीपासून जत शंभर किलोमीटरवर आहे. नोंदणीसाठी जतहून सांगलीला यायचे. नोंदणी करायची आणि पुन्हा जतला जायचे, यासाठी एक दिवस जातो. त्यातच प्रवासाचा खर्च. त्यानंतर विक्रीसाठी पुन्हा सांगलीला माल घेवून यायचे. त्याचे भाडे हा सर्व खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडतो. त्यामुळे नाफेडने जत तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी होत आहे. परंत, या मागणीकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाने दुर्लक्ष केले आहे. 

प्रत्येक तालुक्यात हवे केंद्र

कवठेमहांकाळ, तासगाव या तालुक्यात देखील उडदाची पेरणी शेतकरी करतात. सांगलीपासून कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुके जवळ आहेत. परंतु, गाडीभाडे, शेतातील कामे सोडून विक्रीसाठी यावे लागते. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात केंद्रे सुरु करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...
सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलेसातारा ः दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी...
नुकसानग्रस्तांना अधिकाधिक लाभ द्या :...भंडारा : ‘‘अतिवृष्टी व अवेळी आलेल्या...
नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची डाळिंब...नगर : दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी, तेल्या आणि...
पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : जिल्ह्यात पावसाच्या कमी अधिक स्वरूपात पाऊस...
मराठवाड्यात पीकविमा, नुकसानभरपाई मान्य...नांदेड : ‘‘जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात...