Agriculture news in marathi Start onion market to Pimpalner | Agrowon

पिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

पिंपळनेर, जि.धुळे  : पिंपळनेर (ता.साक्री) येथील बाजार समिती बंद असल्याने उत्पादकांनी कांदा विक्रीसाठी न्यायचा कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे पिंपळनेर बाजार समिती तत्काळ सुरू करावी.

पिंपळनेर, जि.धुळे  : पिंपळनेर (ता.साक्री) येथील बाजार समिती बंद असल्याने उत्पादकांनी कांदा विक्रीसाठी न्यायचा कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे पिंपळनेर बाजार समिती तत्काळ सुरू करावी, अशी मागणी अपर तहसीलदार विनायक थविल यांच्‍याकडे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.

पिंपळनेरसह साक्री येथील कांदा बाजार खानदेशात प्रसिद्ध आहे. या बाजारात नाशिक जिल्ह्यातील सटाणा, नंदुरबारमधील नवापुर तालुक्यातील शेतकरीदेखील कांदा विक्रीसाठी येतात. मोठी आर्थिक उलाढाल या बाजारात होत असते. परंतु शहरात दोन कांदा व्यापारी कोरोना पॉझिटिव्‍ह निघाल्याने दक्षता म्हणून कांदा लिलाव बंद केला आहे. कांदा विक्री थांबविल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

अनेक शेतकऱ्यांचा कांदा चाळीत पडून आहे. चाळीत कांदा खराब होत आहे. साठविलेल्या कांद्यात वारंवार प्रतवारी करून घ्यावी लागत आहे. बाजारात दर कमी आहेत. नजीक कांद्यासाठी प्रसिद्ध बाजार नाही. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

कोरोनामुळे बाजार समिती बंद करणे योग्य नाही. लॉकडाऊन हा उपाय नाही. राज्यात अनेक बाजार समित्या कोरोना वाढत असताना सुरूच आहेत. कारण शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये, याची काळजी त्या भागातील प्रशासन घेत आहे. यामुळे कांदा मार्केट बंद करू नये व बाजार समिती सभापतींनी लक्ष द्यावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत निवेदन बाजार समितीला देण्यात आले. निवेदन देताना कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भदाणे, साक्री तालुकाध्यक्ष अनिल भामरे, महेंद्र नांद्रे व शेतकरी उपस्‍थित होते. 

अतिवृष्टी अनुदान मिळालेले नाही. अनेकदा तहसिल कार्यालय, बँकेत चकरा मारल्या. परंतु, योग्य माहिती मिळत नाही. जाहीर अनुदान मदत तत्काळ मिळावे.
- त्र्यंबक पाटील,  शेतकरी भदाणे (ता. धुळे)
 


इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...