Agriculture news in marathi; 'Start the process of soybean meal process at Jaunfel' | Agrowon

‘जानेफळ येथे सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करा’
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्रीय लघुउद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.  जानेफळ (जि. बुलडाणा) येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने मनिष मांडवगडे यांनी गडकरी यांना सविस्तर निवेदन पाठवले. 

अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्रीय लघुउद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.  जानेफळ (जि. बुलडाणा) येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने मनिष मांडवगडे यांनी गडकरी यांना सविस्तर निवेदन पाठवले. 

या निवेदनात म्हटले की,  केंद्र सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सोयाबीनचे बाजारमूल्य कमी झाले की सर्वसामान्य शेतकरी सरकारच्या धोरणांना जबाबदार धरतात. प्रत्यक्षात सोयाबीनचे दर त्याच्या ढेपीवर (डीओसी) अवलंबून आहेत. डीओसी भारतामधून चीन किंवा अमेरीका देशात पाठविली जाते. वर्षभरापूर्वी अमेरिकेत डीओसी पाठविली जात होती. तेथे प्रक्रिया करून त्यामधून सोयाप्रोटीनसह इतर सुक्ष्म अन्न घटक वेगळे केले जातात. हेच प्रोटीन भारतासह इत देशात फूड सप्लीमेंट आणि औषधी निर्माण कंपन्या खरेदी करतात. डीओसीमधून प्रोटीन व अन्न घटक वेगळे केल्यानंतर शिल्लक राहलेल्या मटेरीअलवर प्रक्रिया करून त्याचा वापर केला जातो.

या प्रक्रियेनुसार अमेरिका सोयाबीनचे दर निश्चित करते. भारतीय सोयाबीनमध्ये ५१ टक्के प्रोटीन आहे. यातील ९ ते १० टक्के तेलामध्ये विरघळते. इतर डीओसीमध्ये कायम राहते. त्यामुळे हा उद्योग आपल्या भागात सुरू करावा. यामुळे सोया प्रोटीनसह इतर अन्न घटक भारतीय कंपन्यांना स्थानिक पातळीवरच मिळेल. डीओसीचे बाजारमूल्य येथे ठरू लागल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकेल. सध्या आपल्याकडे सोयाबीनमधून केवळ तेल वेगळे केले जाते. त्यामुळे हा उद्योग सुरू केल्यास शेतकऱ्यांना त्यापासून फायदा होईल, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
 

इतर बातम्या
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे ः मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
‘त्या’ बँकांमधील शासकीय खाती बंद करणार...यवतमाळ : बँकांच्या आडमुठेपणामुळे शेतकरी...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
मराठवाड्यातील पाणीटंचाईत वाढऔरंगाबाद : पावसाने पाठ फिरविल्याने...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...