कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९
ताज्या घडामोडी
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी सुरू करा'
गडचिरोली ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने देसाईगंज तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी ओबीसी महासंघ देसाईगंजच्या वतीने करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली.
निवेदनानुसार, २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामातील हलक्या प्रतीचे धान पीक निघून एक महिन्याचा कालावधी झाला. मात्र, जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कमी भावाने धानाची विक्री करावी लागत आहे.

परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी त्वरित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
संततधार पावसामुळे यापूर्वी शेतकऱ्यांकडील धानाची प्रत खालावली आहे. त्याचाही उत्पन्नावर परिणाम होणार आहे. व्यापारीदेखील याच कारणामुळे कमी दराने धान खरेदी करीत आहेत. हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्यास काही अंशी स्पर्धा वाढून दरात तेजी येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या संदर्भाने वेळीच निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी ओबीसी महासंघ देसाईगंजच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन देसाईगंज तालुका ओबीस महासंघाचे अध्यक्ष लोकमान्य बरडे, ज्ञानेश्वर कवासे, चक्रधर पारधी, अॅड. संजय गुरू, धनपाल मिसार, जितेंद्र चौधरी, सतिश खरकाटे, दीपक प्रधान मोहन बगमारे, नारायण चौधरी, युवराज पत्रे, प्रा. दामोधर शिंगाडे, नेताजी राऊत, शंकर पारधी, प्रफुल्ल आठवले, पंकज तोंडरे, सुनील पारधी, गोपाल बोरकर यांनी पाठविले आहे.
- 1 of 586
- ››