agriculture news in Marathi, Start of Purchase Turmeric at the bori market committee | Agrowon

बोरी बाजार समितीत हळदखरेदीस प्रारंभ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 एप्रिल 2019

बोरी, जि. परभणी ः बोरी (ता. जिंतूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी (ता. ६) जाहीर लिलाव पद्धतीने हळद खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. मुहूर्ताच्या खरेदीला २०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. हळदीला प्रतिक्विंटल ६ हजार ७०५ रुपये दर मिळाले. या संदर्भात बाजार समितीच्या सूत्रांनी माहिती दिली.

बोरी, जि. परभणी ः बोरी (ता. जिंतूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी (ता. ६) जाहीर लिलाव पद्धतीने हळद खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. मुहूर्ताच्या खरेदीला २०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. हळदीला प्रतिक्विंटल ६ हजार ७०५ रुपये दर मिळाले. या संदर्भात बाजार समितीच्या सूत्रांनी माहिती दिली.

बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांमधील शेतकरी कमी पाण्यावर किफायतशीर उत्पादन देणाऱ्या हळद पिकांचे उत्पादन घेत आहेत. परंतु हळद विक्रीसाठी जवळची बाजारपेठ नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. वसमत, जवळा बाजार आदी ठिकाणच्या बाजारपेठेत हळद विक्रीसाठी न्यावी लागत असे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीने हळद खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी (ता. ६) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रशासकीय अधिकारी माधव यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर लिलाव पद्धतीने हळद खरेदी सुरू करण्यात आली. जिंतूरचे सहायक सहकारी अधिकारी एस. एम. कन्सटवाड, सचिव डी. एल. गायकवाड, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चौधरी, उपाध्यक्ष यमाजी इप्पर उपस्थित होते.

या वेळी प्रथम हळद आणणाऱ्या शेतकरी रावसाहेब घाटुळ (करवली), कुंडलिकराव कदम (बोर्डी), शेख आतिक शेख रफिक (बोरी) या शेतकऱ्याचा सत्कार बाजार समितीतर्फे करण्यात आला.या वेळी व्यापारी त्र्यंबकराव बोर्डीकर, दीपक अग्रवाल, राजगोपाल झंवर, आनंद देशमुख, आनंद मुरक्या, मुरली झंवर, सुनील झंवर, राजू जैन, प्रसाद गोरे, भगवान झंवर, दिगंबर अंभोरे, नंदकुमार पतंगे, पंकज चौधरी, प्रकाश झंवर, लिंबाजी टाक, अनंत देशमुख, प्रकाश देशमुख, हनुमान अग्रवाल, अरुण कदम, प्रवीण बिर्ला, रवी झंवर, एकनाथ गोरे, यांच्यासह शेतकरी दगडूबा वजीर, बाजीराव शेवाळे, वामन शिंपले, रामकृष्ण शिंपले उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे बी. एन. रोडे, मधुकर कदम, आर. एम. टाक, आर. एम. चक्कर, गोविंद राऊत यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी वृंद यांनी पुढकार घेतला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोयाबीनला प्रतिक्विटंल ३ हजार ७५० रुपये, हरभऱ्याला ४ हजार २३० रुपये, तुरीला ५ हजार १०० रुपये, ज्वारीला २ हजार ८५० रुपये दर मिळाले.

इतर बाजारभाव बातम्या
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...
नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
जळगाव बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे...पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या...
औरंगाबादेत भेंडी १००० ते ४००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल सरासरी ५६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगावात टोमॅटो, गवारीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व...
सोलापुरात वांगी, घेवडा, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेमनागपूर ः हरभऱ्याच्या सरासरी एक हजार क्‍विंटलच्या...
पुण्यात कांदा, आले, बीटच्या दरात सुधारणापुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात...
औरंगाबादेत हिरवी मिरची २००० ते २८००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत कारले प्रतिक्विंटल १५०० ते २०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...