Agriculture news in marathi, Start Ramakrishna Upsa Irrigation Scheme` | Agrowon

`रामकृष्ण उपसा सिंचन योजना सुरू करा`

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

महालगाव, जि. औरंगाबाद : रामकृष्ण उपसा सिंचन योजना शासनाने सुरू कारावी. शेतकऱ्यांच्या सातबारावरील कर्ज माफ करावे, यासाठी वैजापूर गंगापूर रोडवर भगुर फाटा येथे १४ गावांतील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.१३) रास्ता रोको केले.

महालगाव, जि. औरंगाबाद : रामकृष्ण उपसा सिंचन योजना शासनाने सुरू कारावी. शेतकऱ्यांच्या सातबारावरील कर्ज माफ करावे, यासाठी वैजापूर गंगापूर रोडवर भगुर फाटा येथे १४ गावांतील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.१३) रास्ता रोको केले.

एक तास सुरू असलेल्या या अंदोलनामुळे  दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. या वेळी तहसीदार यांनी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून या प्रश्नी शासन स्तरावर वरिष्ठाना कळवून प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. नायब तहसीलदार रामेश्वर महाजन यांनी निवेदन स्वीकारले. ३० तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही, तर अंदोलन तीव्र करून जिल्हा बॅंकेला टाळे ठोकू. आत्मदहन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला. 

गेल्या अनेक वर्षांपासून रामकृष्ण गोदावरी जल सिंचन योजनेचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी अनेक वेळा आमरण उपोषण, रास्ता रोको अंदोलने झाली. मात्र अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे हे सर्वपक्षीय शेतकरी अंदोलन करण्यात आले. यात १४ गावांच्या २०७६ शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे यांना कुठली बॅंक कर्ज देत नाही. योजनाही बंद असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्याचा सामना करावा लागतो, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.  

शासनाने ही योजना ताब्यात घेऊन सुरू करावी. शेतकऱ्यांच्या सातबारावरचा कर्जाचा बोजा माफ करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मनाजी मिसाळ, ज्ञानेश्वर घोडके, राजू शेळके, ईश्वर तांबे, राजू मलिक, दिलीप आवारे, नवनाथ चव्हाण, बाळू शेळके,  रामेश्वर पाटोळे, अमोल गलांडे, विक्रम निकम, सागर धनाड, जनार्दन चव्हाण, शरद चव्हाण आदींसह शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला.
 


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...