Agriculture news in marathi Start recruiting government servants | Agrowon

सरकारी नोकर भरती सुरू करा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

 सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने  नव्या वर्षात शासकीय सेवेत सध्या रिक्त असलेल्या एक  लाखापेक्षा जास्त पदांसाठी सुधारित महापोर्टल तयार करून भरती प्रक्रिया सुरू करावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मुंबई : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने २०२१ या नव्या वर्षात शासकीय सेवेत सध्या रिक्त असलेल्या एक  लाखापेक्षा जास्त पदांसाठी सुधारित महापोर्टल तयार करून भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. 

मागील सरकारने मेगाभरतीचा फुगा फुगवून सुशिक्षित बेरोजगारांची दिशाभूल केल्याने तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. राज्याच्या अर्थचक्राला गती देणारा आणि राज्याच्या विकासात योगदान देणारा हा तरुण वर्ग अशा प्रकारे वैफल्यग्रस्त होणे उचित नाही.

राज्यातील शासकीय सेवेत सध्या एक लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असून, सुशिक्षित आणि होतकरू तरुण वर्ग महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ च्या सेवाभरती प्रक्रियेकडे डोळे लावून आहे. या संदर्भात होणारा विलंब त्यांच्यात नैराश्य आणि वैफल्य वाढविणारा ठरण्याची शक्यता आहे.  त्यामुळे या संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोनाची परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याने नवीन वर्षात २०२१ पासून ही भरती प्रक्रिया सुधारित महापोर्टलद्वारे तातडीने सुरू करण्यात यावी.  तसेच कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उमेदवारांची वयोमर्यादा अट शिथिल करण्यात यावी, अशी शिफारस पटोले यांनी केली आहे.

राज्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांची भावना आणि राज्य सरकारकडून त्यांची असलेली अपेक्षा लक्षात घेता आपण या संदर्भात लक्ष घालून तातडीने पावले उचलाल, अशी अपेक्षा ही पटोले यांनी व्यक्त केली आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...