पुणे जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला सुरवात

पुणे जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला सुरवात
पुणे जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षणाला सुरवात

पुणे : जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ला १५ ऑगस्टपासून सुरवात झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत स्वच्छ सर्वेक्षणाच्या मोबाईल अ‍ॅपवर नोंदणी करावी, असे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे. सर्वेक्षणात अभिप्राय नोंदविण्यासाठी स्मार्टफोनधारक ग्रामस्थांनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणतंर्गत ‘एसएसजी २०१९’ हे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करुन, त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ या देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील सर्व गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता निरीक्षण, ग्रामस्थांचे स्वच्छतेविषयक ऑनलाइन अभिप्राय आणि स्वच्छताविषयक सद्यःस्थिती या तीन मानकांच्या आधारे स्वतंत्र संस्थेतर्फे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

त्याचा प्रमुख भाग म्हणजे यातून निघणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे देशातील जिल्ह्यांचे आणि राज्यांचे स्वच्छतेतील स्थान आणि क्रमवारी निश्चित होईल. सर्वेक्षणात सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com