टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू करा

टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू करा
टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू करा

सांगली : यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये शेतीसाठी पाणी कमी पडत असल्यामुळे पिके वाया जाण्याचा धोका आहे. जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसांत जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीमध्ये सदस्यांनी केली. योजना तात्काळ सुरू करण्याच्या मागणीचा ठराव करून शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासनही अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सदस्यांना दिले.

जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जलव्यवस्थापन समितीची सभा झाली. या वेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरुण राजमाने, ब्रह्मानंद पडळकर, तम्मणगौडा पाटील, सुषमा नायकवडी, चंद्रकांत पाटील, आशाराणी पाटील, स्नेहलता जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे आदी उपस्थित होते. यंदा दुष्काळी पट्ट्यात पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी कमी झाली आहे. परिणामी विहिरी, कूपनलिकांना पाणी नाही. हातची पिके वाया जाण्याची भीती आहे. सिंचन योजना सुरू करण्याची मागणी होत आहे. योजना काही दिवस सुरू करून ओढे, नाले, मध्यम प्रकल्प, कालवे, तलाव भरून घेतले, तर शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही. नदीतून वाहून जाणारे पाणी सिंचन योजनांतून वळते करावे, अशी मागणी या वेळी सर्व सदस्यांनी केली. त्यावर देशमुख यांनी, ही मागणी शासनाकडे कळविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना या बैठकीचा अभिप्राय कळविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हा हगणदारीमुक्तीनंतरही अतिरिक्त सर्वेक्षणात २४ हजार कुटुंबांची नोंदणी झालेली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. देशमुख यांनी वंचित कुटुंबे सोधून त्यांचाही समावेश स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात यावा, स्वतंत्र ग्रामसभेचे आयोजन करून मागणी कळवावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास दिल्या.

जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधित ‘स्वच्छता ही सेवा’ जनजागृती अभियान होत आहे. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. सावळज येथील मावले टेक आणि पलूस तालुक्यातील घोगाव येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या कामास मंजुरी देण्यात आली.

टॅँकरची मागणी केलेल्या गावांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तहसीलदारांना अधिकार देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com