Agriculture news in Marathi, Start of Tomato auction in Karanjad Subdistrict | Agrowon

करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवात

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जुलै 2019

नाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार समितीत शुक्रवारपासून (ता. ५) टोमॅटो लिलावास प्रारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हेमंत कोर, उपसभापती लक्ष्मण पवार, ज्येष्ठ संचालक कृष्णा धर्मा भामरे यांच्या हस्ते टोमॅटो कॅरेटपूजन करून नारळ वाढवून लिलावास सुरवात झाली. 

या वेळी परिसरातून २७० कॅरेट विक्रीसाठी दाखल झाला होता. मुगसे येथील महेंद्र निकम या शेतकऱ्याचे एकूण १५ कॅरेट टोमॅटो अंतापूर येथील व्यापारी रोहिदास जाधव यांनी ९१० रुपयांप्रमाणे खरेदी केला. 

नाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार समितीत शुक्रवारपासून (ता. ५) टोमॅटो लिलावास प्रारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हेमंत कोर, उपसभापती लक्ष्मण पवार, ज्येष्ठ संचालक कृष्णा धर्मा भामरे यांच्या हस्ते टोमॅटो कॅरेटपूजन करून नारळ वाढवून लिलावास सुरवात झाली. 

या वेळी परिसरातून २७० कॅरेट विक्रीसाठी दाखल झाला होता. मुगसे येथील महेंद्र निकम या शेतकऱ्याचे एकूण १५ कॅरेट टोमॅटो अंतापूर येथील व्यापारी रोहिदास जाधव यांनी ९१० रुपयांप्रमाणे खरेदी केला. 

या वेळी रविदास जाधव यांच्या हस्ते घेतलेल्या मालाचे पूजन करून संचालक मंडळाच्या वतीने जाधव यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालक भाऊसाहेब कांदळकर, भाऊसाहेब अहिरे, शांताराम निकम, अविनाश सावंत, दीपक पगार, चंद्रभागा शिंदे, आनंदा मोरे, अविनाश निकम, दत्तू बोरसे, संजय भामरे, मधुकर चौधरी, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शशिकांत देवरे, राकेश देवरे, केवळ देवरे, पोपट गवळी, सचिव संतोष गायकवाड, उपसचिव अरुण अहिरे, संजय निकम, शरद बोरसे, संदीप वाघ, विठ्ठल भामरे, शरद देवरे, नीलेश कांकरिया, दिगंबर खैरनार, उत्तम भोये यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 


इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी...नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य...
नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...