agriculture news in Marathi, Start of turmeric harvesting in Verhad | Agrowon

वऱ्हाडात हळद काढणीला सुरवात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

अकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी कमी पडल्याने हळदीच्या उत्पादनावर परिणाम दिसू लागला आहे. हळद काढणीला सुरवात झाली असून, यंदा ८० ते १२० क्विंटलपर्यंत अोल्या हळदीचे एकरी उत्पादन होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाळलेली हळद १५ ते २० क्विंटलदरम्यान निघते आहे. 

गेल्या काही वर्षांत हळदीचे पीक हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून या भागातील शेतकरी याकडे वळाले आहेत. परिणामी या भागात लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. वाशीम, बुलडाणा तसेच अकोला जिल्ह्यांत हळदीचे पीक घेणारे शेतकरी तयार झाले. तिनही जिल्ह्यांत हळदीचे लागवड क्षेत्र किमान पाच हजार एकरांपेक्षा अधिक आहे. 

अकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी कमी पडल्याने हळदीच्या उत्पादनावर परिणाम दिसू लागला आहे. हळद काढणीला सुरवात झाली असून, यंदा ८० ते १२० क्विंटलपर्यंत अोल्या हळदीचे एकरी उत्पादन होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाळलेली हळद १५ ते २० क्विंटलदरम्यान निघते आहे. 

गेल्या काही वर्षांत हळदीचे पीक हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून या भागातील शेतकरी याकडे वळाले आहेत. परिणामी या भागात लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. वाशीम, बुलडाणा तसेच अकोला जिल्ह्यांत हळदीचे पीक घेणारे शेतकरी तयार झाले. तिनही जिल्ह्यांत हळदीचे लागवड क्षेत्र किमान पाच हजार एकरांपेक्षा अधिक आहे. 

या हंगामात लागवड झालेल्या हळदीची काढणी सुरू झाली. कुठे मजुरांच्या साह्याने तर काही ठिकाणी यंत्रांद्वारे काढणी केली जात आहे. या वर्षी अनेक शेतकऱ्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागले. शेवटच्या टप्प्यात द्यायला पाणी कमी मिळाले. त्याचा फटका उत्पादनावर दिसून येत आहे. 

बहुतांश शेतकऱ्यांना एकरात ८० ते १२० क्विंटलदरम्यान अोल्या हळदीचे उत्पादन आहे. गेल्या काही हंगामांच्या तुलनेत यंदा हे उत्पादन कमी निघत आहे. अनेक शेतकरी दरवर्षी १२० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन काढत. चांगल्या नियोजनातून काहींनी १५० क्विंटलचाही टप्पा गाठला होता. यंदा सर्वच शेतकऱ्यांना कमी पाण्याचा व वातावरणाचा फटका सहन करावा लागत आहे. 

काढणी झालेली हळद उकडण्यासाठी बहुतांश शेतकरी यंत्राचा वापर करीत आहेत. त्यामुळे या बॉयलरची मागणी हळूहळू वाढत चालली. बाजारातील हळदीचे दर हंगाम सुरू होताच ६००० पर्यंत खाली आलेले आहेत. येत्या काळात दर वधारतील अशी आशा हळद उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
लाॅकडाउनमुळे नाशिकमधील शेतकऱ्यांचे १०...नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला...
पुण्यातील लॉकडाउनमुळे  साताऱ्यातील...सातारा  ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल...
नगर जिल्ह्यातून पुण्याला होणारा ...नगर ः ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असल्याने सोमवारी...
सोलापुरातून पुण्यात होणारा ७०० टन ...सोलापूर  ः ‘कोरोना’मुळे पुण्यात पुन्हा...
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील टाळेबंदी...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे आणि...
लातुरात मनसे कार्यकर्त्यांनी कृषी...लातूर ः गेल्या काही दिवसांपासून महाबीजसह खासगी...
मका खरेदी न केल्याने संग्रामपूरमध्ये...संग्रामपूर, जि. बुलडाणा ः शासनाच्या भरड धान्य...
अकोला कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
उजनी धरण दोन दिवसांत प्लसमध्ये येणारसोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
सातारा जिल्ह्यात ९३ टक्के पीककर्ज वितरण सातारा ः कोरोनामुळे संथगतीने सुरू असलेली पीक...
धुळे जिल्ह्यात लष्करी अळी...देऊर, जि.धुळे : देऊर (ता.धुळे) सह तालुक्यात...
सुरवाडे परिसरात अतिमूसळधार पाऊस जळगाव : बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द परिसरात...
निसर्ग चक्रीवादळबाधित वीज ग्राहकांचा...मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या वीज...
नामपूर बाजार समितीत ‘रयत’चे आंदोलन नामपूर, जि. नाशिक :  कांदा व डाळिंब उत्पादक...
नांदेडमध्ये सव्वा दोन लाख क्विंटलवर...नांदेड : जिल्ह्यात कोरोना साथीमध्ये राज्य सहकारी...
मका, चारा, कडवळ पिकावर हिरव्या...औरंगाबाद  : तालुक्यातील आडगाव, निपाणी,...
पीक कर्जवाटपात व्यापारी बॅंकांचा ‘ना’...औरंगाबाद : मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या...
मराठवाड्यातील पावसाचा जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात बुधवारी (...
मका पिकासाठी ठिबक सिंचनमका लागवडीसाठी गादी वाफ्याची रुंदी ७५ सेंमी आणि...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...