समन्यायी पाणीवाटपासाठी ‘मराठवाडा ग्रीड’ : मुख्यमंत्री

लासूर स्टेशन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले.
लासूर स्टेशन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले.

औरंगाबाद : महाराष्ट्रात सातत्याने दुष्काळ पडत आहे. तो निवारण्यासाठी जलयुक्‍त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम करण्यात येत आहे. यासह मराठवाड्यात समन्यायी पाणीवाटपासाठी मराठवाडा ग्रीड तयार करण्यात येत आहे. इस्राईल सरकारशी करार केला असून या ग्रीडच्या माध्यमातून समन्यायी तत्त्वाने पाणीवाटप करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लासूर स्टेशन येथे दिली.

गंगापूर तालुक्‍यातील रांजणगाव (पोळ) येथील लघू सिंचन प्रकल्पातील बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर फंडातून व लोकवर्गणीतून गाळ काढण्याच्या २६२ कोटी रुपयांच्या कामाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या रविवारी (ता. ४) हस्ते झाला. त्यानंतर लासूर येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब, आमदार अतुल सावे, बजाज ऑटो लिमिटेडचे उपाध्यक्ष मधुर बजाज, जानकीदेवी बजाज ग्रामविकास ट्रस्टचे चेअरमन चंद्रकांत त्रिपाठी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शिरीष बोराळकर, गावच्या सरपंच राणी विलास प्रधान, उपसरपंच दत्तू रावसाहेब कुऱ्हाडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पुष्पाताई जाधव, ग्रामपंचायतचे सदस्य भागिनाथ रोकडे, शिवाजी पाटील बोडखे यांची उपस्थिती होती.

बजाज ऑटो लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून तसेच लोकवर्गणीतून गंगापूर तालुक्‍यातील ११० गाव परिसरातील तलावातील गाळ काढण्यात येणार असून, याचा लाभ परिसरातील २५ हजार ८४७ कुटुंबांना व १ लाख ४४ हजार ६५७ लोकसंख्येला होणार आहे. हे काम ११ पोकलॅन मशिन, दोन जेसीबी मशिन तसेच ५१ वाहनांच्या (टिप्पर) साह्याने करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना बजाज कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की मराठवाडा ग्रीड हे देशातील पहिली ग्रीड असणार आहे. यासह दमणगंगा- पिंजाळ प्रकल्पातून ५० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात अडवून नाशिक, नगर, औरंगाबादसह मराठवाडा दुष्काळमुक्‍त करणार आहोत. यात गंगापूर तालुक्‍यातील २५ हजार एकर जमीन ओलिताखाली आण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com