दरेसरसम साठवण तलावाचे काम सुरू करा

दरेसरसम साठवण तलावाचे काम सुरू करा
दरेसरसम साठवण तलावाचे काम सुरू करा

नांदेड : दरेसरसम (ता. हिमायतनगर) येथील साठवण तलावाचे काम सुरू करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कार्यक्षेत्रावर जाऊन ग्रामस्थ आणि संबंधित शेतकऱ्यांसोबत चर्चा करावी. सिंचन आणि पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने असलेल्या या तलावाच्या कामाचे महत्त्व पटवून द्यावे, काम सुरू करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. 

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये डोंगरे बोलत होते. दरेसरसम (ता. हिमायतनगर) गावाजवळ स्थानिक नाल्यावर साठवण तलाव बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे २.५१० दलघमी पाणीसाठा निर्माण होणार आहे. या तलावाची सिंचन क्षमता २५८ हेक्टर आहे. तलावाच्या खालील बाजूस तीन साखळी बंधारे प्रस्तावित आहेत. त्यातून बारमाही सिंचनाचा लाभ दरेसरसम आणि आंदेगाव या गावातील शेतीला होणार आहे. यामुळे परिसरातील विहीरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील मार्गी लागणार आहे.

 या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया २००७ च्या शिघ्रगणकावर आधारित मूल्यांकनानुसार २०११ मध्ये मोबदला अदायगी करून खरेदीखत करून घेण्यात आले. आता या जमिनीचा सातबारा शासनाच्या नावे आहे. मावेजाची रक्कम मान्य नसल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचे काम २०१२ मध्ये बंद पाडले. त्यांच्या मागणीनुसार २००७ ते २०११ च्या शीघ्रगणकाच्या मूल्यांकनातील फरकाची रक्कम विशेष बाब म्हणून नियामक मंडळाकडून मंजूर केली. मावेजाचे धनादेश या शेतकऱ्यांना ३ जून २०१८ पासून वाटप करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सहमतीने प्रकल्पाचे काम चालू करण्यात आले.

या तलावाचा पुच्छ कालवा, संरक्षक बांध यासाठी आवश्यक ११.५४ हेक्टर जमिनीची भूसंपादन प्रक्रिया २०१८ मध्ये सुरू झाल्यामुळे त्यास भूसंपादन कायदा २०१३ नुसार २०१८ च्या शीघ्रगणकानुसार दर देण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com