Agriculture news in marathi Started by District Deputy Registrar Transactions in the Market Committee | Page 3 ||| Agrowon

जिल्हा उपनिबंधकांनी सुरू केले बाजार समितीतील व्यवहार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

अकोट  कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक अनियमितता झाल्याप्रकरणी सचिव व लेखापालाविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामबंदचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर यांनी स्वतः  व्यवहार सुरळीत सुरू केले.

अकोट, जि. अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक अनियमितता झाल्याप्रकरणी सचिव व लेखापालाविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर सोमवारी (ता.२१) कर्मचाऱ्यांनी कामबंदचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर यांनी स्वतः तेथे जात बाजार समितीतील व्यवहार सुरळीत सुरू केले. कर्मचाऱ्यांनी लावलेले कुलूप त्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आले.

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे १६ लाखांचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिव व लेखापालाविरुद्ध गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू केली आहे. हे प्रकरण गाजत असताना सोमवारी (ता.२१) बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करीत कार्यालयाला कुलूप लावले होते. मात्र, शेतमाल विक्रीसाठी बाजारात शेतकऱ्यांची या वेळी मोठी गर्दी झाली होती.

हा प्रकार जिल्हा उपनिबंधक कहाळेकर यांच्यापर्यंत पोचल्यानंतर ते अकोटमध्ये दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत कार्यालयाला लावलेले कुलूप तोडण्यात आले. बाजार समितीतील व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामबंदविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये एकच रोष व्यक्त केल्या जात होता.

प्रतिक्रिया
सचिव व लेखापालाविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सचिवाच्या समर्थनार्थ कर्मचाऱ्यांनी कामबंद पुकारले होते. वास्तविक गुन्हे पोलिसांनी दाखल केले असताना, अशी कृती योग्य नव्हती. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी चार-पाचशे शेतकरी आलेले होते. त्यामुळे मी तेथे जाऊन कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले.
-विनायक कहाळेकर, जिल्हा उपनिबंधक, अकोला


इतर बातम्या
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...