राजारामबापूंच्या जन्मशताब्दीस आजपासून प्रारंभ

राजारामबापूंच्या जन्मशताब्दीस आजपासून प्रारंभ
राजारामबापूंच्या जन्मशताब्दीस आजपासून प्रारंभ

इस्लामपूर, जि. सांगली ः लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा प्रारंभ गुरुवारी (ता. १) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. सोहळा शानदार होण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर दुपारी एक वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. 

जन्मशताब्दी समितीच्या वतीने अध्यक्ष प्रा. श्‍यामराव पाटील, पी. आर. पाटील यांनी ही माहिती दिली. दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर. डी. सावंत, बाळासाहेब पाटील, विजय पाटील, संजय पाटील, सुश्‍मिता जाधव, संदीप माळी उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले, ‘‘लोकनेते राजारामबापूंनी २५ व्या वर्षी १९४५ मध्ये शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक कार्यास प्रारंभ केला. वकिलीची पदवी घेतली. त्यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले. स्वातंत्र्यलढा अंतिम टप्प्यात होता. त्यातही मंदिरप्रवेश, ब्रिटिश कपड्यांची होळी यात ते सहभागी झाले. प्रारंभी सातारा व सांगली जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले. गाव तेथे आड, स्वच्छ पाणी, गाव तेथे शाळा कामात झोकून दिले. कॉंग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान दिले. सन १९६२ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. नंतर महसूल, वीज, ग्रामविकास, अर्थ व नियोजन विभागात काम करून कर्तृत्वाची छाप उमटवली.’’ 

श्री. पाटील म्हणाले, ‘‘जन्मशताब्दीच्या निमित्ताने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, बबनराव ढाकणे, माजी मंत्री व आमदार जयंत पाटील, अण्णासाहेब डांगे, युवा नेता कन्हैयाकुमार, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, मधुकर भावे, लक्ष्मण माने यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला आहे. सरोजिनी चव्हाण लिखित ‘विधिमंडळातील बापू’ व ‘राजयोगी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com