agriculture news in Marathi state advisory price remain same in Uttar pradesh Maharashtra | Agrowon

उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाही

कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांनी ‘एसएपी’वाढीची मागणी केली आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून उसाचा दर वाढविला नाही.
- प्रियांका गांधी, कॉँग्रेस महासचिव, उत्तर प्रदेश

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या वर्षी राज्य निर्धारित मूल्य (एसएपी) स्थिर ठेवले आहे. केंद्र सरकारने २०१९-२० च्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन २७५० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. तर, राज्य सरकारने ‘एसएपी’त सलग दुसऱ्या वर्षी कोणाताही बदल न करता सर्वसाधारण जातीसाठी ३१५० रुपये कायम ठेवले आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या निवेदनातून मिळाली. 

केंद्र सरकारने २०१९-२० च्या गाळप हंगामासाठी २७५० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. एफआरपी असा दर आहे जो देशभरातील ऊस उत्पादकांना मिळण्याची शाश्‍वती दिली जाते. एफआरपी कृषी खर्च आणि किंमत आयोगाने (सीएसीपी) केलेल्या शिफारशीवरून केंद्र सरकार ठरवीत असते. केंद्राने एफआरपी जाहीर केल्यानंतर राज्य सरकार यावर ‘एसएपी’ जाहीर करू शकते.

‘एसएपी’ ही नेहमी एफआरपीपेक्षा अधिक असते. उत्तर प्रदेश सरकारने २०१९-२० च्या गाळप हंगामासाठी ‘एसएपी’ जाहीर केली आहे. उसाच्या सर्वसाधारण जातीसाठी प्रतिटन ३१५० रुपये, तर लवकर पक्व होणाऱ्या उसासाठी ३२५० रुपये आणि कमी प्रतीच्या उसाला ३१०० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे.   

राज्यांतील साखर उद्योगापुढे जेव्हा साखरेचा अतिरिक्त साठा आणि शेतकऱ्यांची थकबाकी अशा अडचणी उभ्या राहिल्यास ‘एसएपी’तील वाढ ही उद्योगासाठी प्रतिकूल ठरते. ‘‘सध्या राज्यातील साखर उद्योगाची आर्थिक स्थिती चांगली नाही. मागील दोन वर्षांपासून साखर उत्पादनात वाढ होत असल्यामुळे अतिरिक्त पुरवठा होऊन दर दबावात आहेत. त्यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांची देणी देणे अवघड झाले आहे.

अशा स्थितीत राज्यसरकारने ‘एसएपी’ वाढविल्यास पुढे यावे आणि कारखान्यांना अनुदान, तसेच इतर साह्य द्यावे,’’ असे आवाहन उद्योगातील सूत्रांनी केले.  उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची मागील गाळप हंगामातील तब्बल तीन हजार कोटींची थकबाकी आहे. 

कारखान्यांची ‘एसएपी’ स्थिर ठेवण्याची मागणी
उत्तर प्रदेशातील साखर कारखाने दराअभावी अडचणीत आले आहेत. मागील हंगामात बाजारात साखरेचा अतिरिक्त पुरवठा झाल्याने दर कमी झाले. परिणामी मागील हंगामातील थकबाकी अनेक कारखान्यांकडे अद्यापही बाकी आहे. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता राज्य सरकारने ‘एसएपी’त वाढ करू नये, अशी मागणी उत्तर प्रदेश साखर कारखाना असोसिएशनने केली होती. 

‘एसएपी’ ४ हजार करा ः शेतकरी
शेतकऱ्यांनी ‘एसएपी’ वाढ करण्याची मागणी केली होती. कृषी निविष्ठांचा वाढता खर्च, नैसर्गिक संकटे यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडत आहे. निविष्ठांमध्ये सतत वाढ होत असल्याने उत्पादन खर्च वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘एसएपी’ चार हजार रुपये करावी, अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांनी केली होती.  


इतर बातम्या
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
खानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा...जळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर...
वाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...
‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’...अकोला  ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या...
रत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा...रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१...
नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार...नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प,...
निवृत्तीनाथ वारी ठरली ‘निर्मलवारी’नाशिक  : त्र्यंबकेश्‍वर येथे संत निवृत्तीनाथ...
काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी...अमरावती  ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या...
नाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...नाशिक  : नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे...
व्हिडिओतील छेडछाड भोवली; प्रभारी सहकार...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सापडलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने केले...सातारा ः सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला...
नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून...मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या...
सातारा जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी...सातारा  : चालू आर्थिक वर्षात विविध...
सावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे...अकोला ः वर्षानुवर्षे सावकारांकडे गहाण पडून असलेले...
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...
कृषिमंत्री पाठविणार चार हजार सरपंचांना...मुंबई : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक...
बाजार समित्यांत शेतकऱ्यांना थेट मतदान...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
अनिल कवडे सहकार; सौरभ राव साखर आयुक्तमुंबई : अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या...