agriculture news in Marathi state agri laws available recommendation Maharashtra | Agrowon

राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी उपलब्ध 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 जुलै 2021

महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी कायद्यांसाठी तयार केलेली तीन विधेयके लोकाभिप्रायासाठी अखेर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी कायद्यांसाठी तयार केलेली तीन विधेयके लोकाभिप्रायासाठी अखेर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून या विधेयकांबाबत राज्यभर विचारणा केली जात होती. 

केंद्रातील मोदी सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांना राज्यातील आघाडी सरकारने कडाडून विरोध केलेला आहे. मात्र पावसाळी अधिवेशनात महाआघाडी सरकारने ६ जुलै रोजी राज्याची तीन कृषी विधेयके सादर केली. 

राज्याची ही विधेयके केंद्राच्याच कृषी कायद्याचे प्रतिरूप असल्याची टीका शेतकरी संघटनांनी केली होती. सरकारने मात्र विधेयके मागे न घेता लोकाभिप्रायासाठी ठेवली जातील, असे विधिमंडळात घोषित केले. 

विधेयके लोकाभिप्रायासाठी जाहीर करण्याची घोषणा झाली खरी, मात्र गेल्या १०-१५ दिवसांपासून कोणत्याही संकेतस्थळावर विधेयके उपलब्ध नव्हती. आता विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी विधिमंडळाच्या http://mls.org.in संकेतस्थळावर विधेयके उपलब्ध असल्याचा निर्वाळा दिला आहे. 

शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) आश्‍वासित मूल्य व कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (प्रचालन व सुलभीकरण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक आणि अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक अशी या विधेयकांची नावे आहेत. 

अशी पाठवा सूचना 
नागरिकांना २० सप्टेंबरच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत या विधेयकांवर सूचना पाठवता येतील. a1.assembly.mls@gmail.com या मेलवर किंवा राजेंद्र भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लेमेशन, मुंबई ४०००३२ या पत्त्यावर सूचना स्वीकारल्या जात आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...