राजेंद्र पवार, संजीव माने, सालोटकर ठरले ‘कृषिरत्न’

कृषी व कृषी संलग्न क्षेत्राला कष्टपूर्वक प्रयोगशीलतेमधून नवी दिशा देणाऱ्या शेतकरी तसेच संस्थांना दिले जाणारे राज्य शासनाचे २०१८ व २०१९ मधील कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
राजेंद्र पवार, संजीव माने, सालोटकर ठरले ‘कृषिरत्न’
राजेंद्र पवार, संजीव माने, सालोटकर ठरले ‘कृषिरत्न’

पुणे ः कृषी व कृषी संलग्न क्षेत्राला आपल्या कष्टपूर्वक प्रयोगशीलतेमधून नवी दिशा देणाऱ्या शेतकरी आणि संस्थांसाठी दिले जाणारे राज्य शासनाचे प्रतिष्ठेचे कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. राजेंद्र पवार, संजीव माने, सुनंदा सालोटकर यांची निवड मानाच्या ‘कृषिरत्न’ पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. कृषिमंत्री दादा भुसे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी पुरस्कार्थींचे अभिनंदन केले आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही व्यक्तिशः संपर्क साधून पुरस्कार्थींना शुभेच्छा दिल्या.  राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून पुरस्कारांची घोषणा केली जाते. यंदा २०१८ व २०१९ या वर्षातील पुरस्कार्थीं जाहीर करण्यात आले. यात सन २०१८ चा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार मिळालेले संजीव गणपतराव माने (आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी राज्याच्या ऊसशेतीत उच्चांकी उत्पादनवाढीचे प्रयोग केले आहेत. दरवर्षी हजारो शेतकऱ्यांपर्यंत ते प्रत्यक्ष तसेच समाज माध्यमांमधून आधुनिक ऊसशेतीचे तंत्रज्ञान पोहोचवत आहेत.  राज्याचा २०१९ चा कृषिरत्न पुरस्कार जाहीर झालेले राजेंद्र दिनकरराव पवार (पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे) हे बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट चेअरमन आहेत. त्यांनी बारामतीत राष्ट्रीय पातळीवरचे केव्हीके तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेची अधिस्वीकृती मिळवणारे राज्यातील पहिले कृषी महाविद्यालय उभारून कृषी शिक्षणात मोलाची भर टाकली आहे. याशिवाय लाखो शेतकऱ्यांचा सहभाग असलेले कृषक प्रदर्शनाचे आयोजन ते करतात. यामुळे कृषी विस्तारात ट्रस्टकडून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.  कृषिरत्न पुरस्कारप्राप्त श्रीमती सुनंदा संतोषराव सालोटकर जाधव (सोनेगाव, ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर) यांनी चिवट संघर्षातून फळशेतीत आदर्श कामे केली आहेत. त्यांनी केलेल्या प्रयोगशील शेतीमधून हजारो महिलांनी प्रेरणा घेतली आहे. यापूर्वी अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या सुनंदाताईंच्या जीवनावर चित्रपटनिर्मिती देखील झाली आहे.  कृषिरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल संजीव माने म्हणाले, की ‘अॅग्रोवन’ने राज्याचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार यापूर्वीच दिला. तेव्हा मला खूप आनंद झाला होता. आताही मला तितकाच आनंद होतो आहे. अर्थात, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून अनेक शास्त्रज्ञ व शेतकरी सोबत्यांचा आहे. कृषी विद्यापीठ, व्हीएसआय, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, डीएसटीए या संस्थांमधील शास्त्रज्ञांनी दिलेले तंत्रज्ञान आम्ही सर्व कष्टपूर्वक शेतकऱ्यांपर्यंत नेतो आहोत. हा पुरस्कार म्हणजे त्या प्रय़त्नांची शासनाने घेतलेली दखल होय.”   ‘अॅग्रोवन’चे इंगोले, चौगुले, हागे यांना पुरस्कार राज्य शासनाने घोषित केलेल्या दोन वर्षांच्या कृषी पुरस्कारांच्या यादीवर ‘अॅग्रोवन’ने मोहोर उमटवली आहे. राज्यातील ‘अॅग्रोवन’चे तीन बातमीदार विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. नागपूरचे बातमीदार विनोद ज्ञानदेवराव इंगोले (धाकली, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला) यांना २०१८ चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच कोल्हापूरचे बातमीदार राजकुमार बापूसो चौगुले (दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) तसेच अकोला येथील बातमीदार गोपाल जगन्नाथराव हागे (केशवनगर, जि. अकोला) यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-२०१९ मिळाला आहे. 

 पुरस्कार्थींची यादी अशी ः

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- २०१८ संजीव गणपतराव माने (आष्टा, ता.वाळवा, जि. सांगली)

वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार- २०१८  विजय जगन्नाथ माळी (शिरगाव, ता.जि. पालघर), कारभारी महादू सांगळे (वडगाव, ता. सिन्नर, जि.नाशिक), वाल्मीक आनंदराव पाटील (चांदे, ता.जि. नाशिक), गंगाराम धोंडू धिंदळे (शिरपुंजे, ता. अकोले, जि. नगर), रवी अशोक पाटील (अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली), जनार्दन संतराम अडसूळ (तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा), अप्पासाहेब पांडुरंग पाटील (सागाव, ता. कागल, जि. कोल्हापूर), दत्तात्रय महादेव जाधव (उदंडवडगाव, ता.जि. बीड), नानासाहेब शंकरराव गायके (सुलतानाबाद, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), तात्यासाहेब तुळशीराम गोरे (आंतरगाव, ता. भूम, जि. उस्मानाबाद).

जिजामाता कृषिभूषण पुरस्कार -२०१८  सौ. प्राजक्ता गिरिधारी काळे (वहाणगाव, ता. मावळ, जि. पुणे).

कृषिभूषण (सेंद्रिय शेती) -२०१८  अनिल वामन पाटील (माहिमरोड, पालघर), अनिल जीवराम सपकाळे (करंज, ता.जि. जळगाव), नागेश अर्जुन ननवरे (दारफळ, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर), अशोक गजानन चिवटे (किन्हई, ता. कोरेगाव, जि. सातारा), रायसिंग झेंडुसिंग सुंदरडे (राजेवाडी, ता. बदनापूर, जि. जालना), बाबासाहेब तात्याराव रनेर (बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी), राधेश्याम गोविंदराव मंत्री (पुसदनाका, ता.जि. वाशीम),तानाजी गोपाल गायधने (चिखली, ता.जि. भंडारा).

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-२०१८ बालचंद कपूरचंद घुनावत (लाखेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद), मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे (चिलवडी, ता.जि. उस्मानाबाद), डॉ. प्रदीप चिंतामण सूर्यवंशी (वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर).

उद्यान पंडित पुरस्कार-२०१८ शेखर शिवाजीराव विचारे (वरवेली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), सीताराम काळू चौधरी (मांगधे, ता. सुरगाणा, जि. नाशिक), किरण नवनाथ डोके (कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर), काकासाहेब रावसाहेब सावंत (अंतराळ, ता. जत, जि. सांगली), सुदाम नामदेव शिरवत (मुलानी वाडगाव, जि. औरंगाबाद), धोंडिराम इरवंत सुपारे (टाकळगाव, ता. हदगाव, जि. नांदेड), प्रफुल्ल गणपतराव हेलोडे (सिंभोरा, ता. मोर्शी, जि. अमरावती), निळकंठ विठ्ठलराव कोढे (घापेगाव, ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर). वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-२०१८  (सर्वसाधारण गट) मिलिंद दिनकर वैद्य (रिळ, ता.जि. रत्नागिरी), विनायक भास्कर पाटील (दलोंडेपाडा, ता. भिवंडी, जि. ठाणे), केशव तुकाराम देसले (वेहेळे, ता. कल्याण, जि. ठाणे), बबनराव धोंडिराम कांगणे (दोनवडे, ता.जि. नाशिक), नामदेवराव शिवाजीराव बस्ते (तळेगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक), भागवत विठोबा बलक (वडगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक), शंकर नारायण काळे (काळेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे), मुकुंद बबन ठाकर (येळसे, ता. वडगाव मावळ, जि. पुणे), विकास हरिभाऊ चव्हाण (पारगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), धोंडिराम खानगोंडा कतगर (सुळकुड, ता. कागल, जि. कोल्हापूर), दिलीप धोंडिराम चौगुले (हरपवडे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), निवृत्ती नामदेव डिडोरे (औरंगपूर, ता.जि. औरंगाबाद), श्रीमती सुचिता दत्तात्रय सिनगारे (खेडगाव, ता. अंबड, जि. जालना), चौरंगनाथ भीमराव वाघमोडे (शिराळा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), नागनाथ भगवंत पाटील (लिंबाळवाडी, ता. चाकूर, जि. लातूर), डॉ. शशिभूषण भाऊरावजी उमेकर (टेंभुरखेडा, ता. वरूड, जि. अमरावती), विनोद ज्ञानदेवराव इंगोले (धाकली, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला), विष्णू रामभाऊ आथिलकर (नेरी, ता. मोहाडी, जि. भंडारा), ऋषिकुमार युवराज टेंभरे (चुटिया, ता.जि. गोंदिया).

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-२०१८  (आदिवासी गट) तानाजी जानू गावंडा (चिंचवली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे), गंगाधर धाऊ वाख (घरटन, ता. शहापूर, जि. ठाणे), श्‍यामराव काशिनाथ गांवढे (गावंडपाडा, ता. पेठ, जि. नाशिक), कुमारसिंग थावऱ्या पावरा (बोराडी, ता. शिरपूर, जि. धुळे),कांताराम लुमाजी लोहकरे (तेरुंगन, ता. आंबेगाव, जि. पुणे), अन्नस्वामी रामभाऊ कोडापे (जामगड, ता. उमरेड, जि. नागपूर).

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील  कृषिसेवारत्न पुरस्कार -२०१८ सुनील रघुनाथ लांडगे (मंडळ कृषी अधिकारी, ता. हवेली, जि. पुणे), वसंत यशवंतराव कातबने (कृषी सहायक, ता. पैठण, जि. औरंगाबाद)

राज्यस्तरीय पीकस्पर्धा विजेते  शेतकरी-२०१८ : (सोयाबीन)  साताप्पा यशवंत पाटील (येळवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), देवेंद्र हणमंत यादव (करंजीत, ता.जि. सातारा), मलगोंडा सातगोंडा टेळे (म्हसवे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर)

राज्यस्तरीय पीकस्पर्धा विजेते  शेतकरी-२०१८ : (भात)  बाळगोंडा बाबगोंडा पाटील (किणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), रवींद्र वसंत पाटील (पाडळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), क्रांतिसिंह संपतराव पवार पाटील (बाचणी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार-२०१९ राजेंद्र दिनकर पवार (पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे), श्रीमती सुनंदा संतोषराव सालोटकर जाधव (सोनेगाव, ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर)

वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार-२०१९   विनायक रघुनाथ बारी (कंक्राणी, ता. डहाणू, जि. पालघर), नरेंद्र रावसाहेब भदाणे (सामोडे, ता. साक्री, जि. धुळे), जनार्दन जोती काटकर (वडजल, ता. माण, जि. सातारा), सुनील आनंदराव माने (आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), सिकंदर कडुबा जाधव (जळगाव फेरण, ता.जि. औरंगाबाद), किसन भुऱ्या कासदेकर (बारू, ता. धारणी, जि. अमरावती), सतीश विठ्ठलराव खडके (वाघोली, ता.जि. उस्मानाबाद), दिलीप नामदेव शेंडे (मेंढा, ता. सिंदेवाही, जि. नागपूर), बळवंत सदाशिव डडमल (मांडवा, ता. हिंगणा, जि. नागपूर), जितेंद्र चंद्रकांत बिडवई (गोळेगाव, ता. जुन्नर, जि. पुणे).

जिजामाता कृषिभूषण पुरस्कार -२०१९ सौ. संगीता वाल्मीक सांगळे (सत्तेगाव, ता. येवला, जि. नाशिक), सौ. सुनीता रामभाऊ खेमनार (साकुरी, ता. मालेगाव, जि. नाशिक), श्रीमती मेघा विलासराव देशमुख (जरी, ता.जि. परभणी), सौ. आशा शिवाजी खलाटे (कांबळेश्‍वर, ता. बारामती, जि. पुणे), सौ. प्रतिभा प्रभाकर चौधरी (नवेगाव, ता.जि. गडचिरोली).

कृषिभूषण (सेंद्रिय शेती) २०१९  मिनेश मोहन गाडगीळ (गुळसुंदे, ता.पनवेल, जि. रायगड), यशवंत महादू गावंडे (गावंधपाडा, ता. पेठ, जि. नाशिक), दादासाहेब नामदेव पाटील (बिटरगा, ता. करमाळा, जि. सोलापूर), सचिन तानाजी येवले (पडवळवाडी, ता. वाळवा, जि. सांगली), अजय प्रकाश जाधव (खेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद), भगवान रामजी इंगोले (मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड), प्रल्हाद संपत गवते (मंगरूळ, ता. चिखली, जि. बुलडाणा), सुनील मारोतराव कोंडे (सावंगी तोमर, ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर)

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-२०१९  गोपाल जगन्नाथराव हागे (केशवनगर, जि. अकोला), सौ. श्रद्धा सुनील कासोडे (पाथर्डीफाटा, ता.जि. नाशिक), राजकुमार बापूसो चौगुले (दानोळी, ता. शिरूर, जि. कोल्हापूर)

उद्यान पंडित पुरस्कार-२०१९ रामचंद्र रावजी कदम (बोरस, ता. पोलादपूर, जि. रायगड), बाळासाहेब कडू देवरे (वाजगाव, ता. देवळा, जि. नाशिक), राहुल अमृता रसाळ (निघोज, ता. पारनेर, जि. नगर), रामकृष्ण ज्ञानदेव वरुडे (निमसोड, ता. खटाव, जि. सातारा), अभयकुमार बाजीराव काळुंके (रायपूर, ता. परतूर, जि. जालना), प्रताप किसनराव काळे (धानोरा काळे, ता. पूर्णा, जि. परभणी), जगदीश हरिदास चव्हाण (गाजीपूर, ता. दारव्हा, जि. यवतमाळ), ज्ञानेश्‍वर दौलत बनसिंगे (कोछी, ता. सावनेर, जि. नागपूर) 

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-२०१९  (सर्वसाधारण गट) रूपेश दशरथ चोरगे (गोवेली, ता. कल्याण, जि. ठाणे), शिवप्रसाद काशिनाथ देसाई (बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), शरद प्रकाश पवार (पढावद, ता. शिंदखेडा, जि. धुळे), विनोद कृष्णा जाधव (सातमाने, ता. मालेगाव, जि. नाशिक), एकनाथ शंकर चव्हाण (जुने निरपूर, ता. बागलाण, जि. नाशिक), सौ. मंगल मारुती दळवी (येळसे, ता. मावळ, जि. पुणे), भानुदास मारुती दरेकर (पापळवाडी, ता. खेड, जि. पुणे), धनंजय भिकू चव्हाण (म्हसवे, ता.जि. सातारा), महादेव हिंदुराव पाटील (जाफळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), प्रशांत श्रीधर लटपटे (सावळवाडी, ता. मिरज, जि. सांगली), अण्णासाहेब अर्जुनराव जगताप (सावरगाव, ता. माजलगाव, जि. बीड), अंबादास सखाराम बनसोड (भावडा, ता.जि. औरंगाबाद), दत्तात्रेय नामदेवराव कदम (दहामदरी, ता. अर्धापूर, नांदेड), देवराव अंबाजी शिंदे (मुरसूल, ता. पूर्णा, जि. परभणी), सौ. सरला रमेश मोहिते (नवीन सोनखास, ता. मंगरूळपीर, जि. वाशीम), सौ.अनिता रावसिंग पवार (मलगी, ता. चिखली, जि. बुलडाणा), प्रवीण देवदास कापगते (सिंदीपार, ता. सडकअर्जुनी, जि. गोंदिया), डुलीचंद नारायण पटले (बिहिरिया, ता. तिरोडा, जि. गोंदिया), घनशाम बळिराम पारधी (किन्ही, ता. साकुली, जि. भंडारा)

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी  पुरस्कार-२०१९ ः (आदिवासी गट)  नितीन मधुसूदन गवळी (पायगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे), श्रीमती राजूबाई गुणाजी वाघे (अंबर्जे, ता. शहापूर, जि. ठाणे), सीताराम अर्जुन हाडस (दुर्गापूर, ता. सुरगाणा, जि. नाशिक), शांतारामभाऊ वारे (ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे), महेंद्र दौलत नैताम (खैरगाव, ता. केळापूर, जि. यवतमाळ), गुरुदास अर्जुन मसराम (पांढरवाणी, ता. शिंदेवाही, जि. चंद्रपूर) 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवारत्न पुरस्कार -२०१९ : (अधिकारी संवर्ग) उदय अण्णसाहेब देशमुख (मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय), श्रीमती क्रांती रवींद्र चौधरी मोरे (कृषई अधिकारी, ता. उरण, जि. रायगड)

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवारत्न पुरस्कार -२०१९: (कर्मचारी संवर्ग) कृषी पर्यवेक्षक दिलीप गोविंद दोरगे (विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय)

राज्यस्तरीय पीकस्पर्धा विजेते  शेतकरी-२०१९ : (भात)  लक्ष्मण अनंत वराडकर (केळुस, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग), बाबूराव अप्पाजी परीट (सुळकुड, ता. कागल, जि. कोल्हापूर), मलगोंडा सातगोंडा टेळे (सुळकुड, ता. कागल, जि. कोल्हापूर).

राज्यस्तरीय पीकस्पर्धा विजेते  शेतकरी-२०१९ : (सोयाबीन)  शहाजी रंगराव पाटील (तासगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सौ. सुशीला अरुण कुंभार (तासगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सौ. अनिता मच्छिंद्र कुंभार (तासगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com