राज्यात पावसाने सर्वत्र दाणादाण

कोकण, मध्य महाराष्ट्र व दक्षिण मराठवाड्याच्या भागात परतीच्या मुसळधार पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही मंडळात अतिवृष्टी झाली.
Rains in the state
Rains in the state

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र व दक्षिण मराठवाड्याच्या भागात परतीच्या मुसळधार पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही मंडळात अतिवृष्टी झाली. चार दिवसांपासून सततच्या पावसाने काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. ऊस, कांदा, डाळिंब, द्राक्ष या पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. बुधवारीही दिवसभर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

कोकणात भात शेती धोक्यात कोकणातील सर्वच जिल्ह्याच्या बहुतांशी भागात बुधवारी (ता. १४) सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काढणीला आलेले भातपीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहीले आहे. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्ग या भागात मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे भात शेती संकटात सापडली आहे. अनेक भात खाचरात पाणी साचल्यामुळे भाताच्या लोंब्या पाण्यातच तरंगत आहेत. त्याचा परिणाम भात उत्पादनावर होणार असून भात शेती संकटात सापडली आहे. याशिवाय तुळसणी (ता. देवरूख) येथे विजेच्या धक्क्याने एक महिला मृत झाल्याची दुदैवी घटना घडली तसेच मेघी सोलकरवाडी येथे वीज पडल्याने हसम कुटुंबातील दोन जण बेशुद्ध पडले होते.

मध्य महाराष्ट्रात संततधार नाशिक, पुणे, नगर भागात बऱ्याच भागात जोरदार पाऊस झाला. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. मात्र कृषी विभागाकडून अजूनही पंचनामे झाले नाहीत. सांगली जिल्ह्यात गेली तीन दिवस झालेल्या अवेळी पावसामुळे ३३ टक्केहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे तीन हजार ६४० एवढी आहे. ऊस, डाळिंब, केळी, भाजीपाला, बाजरी सह अन्य २२६८ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी (ता. १३) रात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस बुधवारी दुपारपर्यंत कोसळतच राहिला. पुण्यातही दिवसभर पाऊस कोसळत असल्याने भातासह इतर पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना होती. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवसभर जोरदार पाऊस बरसत होता. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे प्रत्येक गावातील नदी नाले ओसंडून वाहत असल्याने अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील मार्ग बंद पडण्याचे प्रकार घडले.

मराठवाड्यात कापूस, सोयाबीनला फटका मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात पावसाची कमी-अधिक प्रमाणात हजेरी कायम आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ४१ मंडळात अतिवृष्टी झाली. दोन्ही जिल्ह्यातील १३ मंडळात १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. काढणीला आलेल्या सोयाबीनला पावसाचा मोठा फटका बसला आहे.

लातूर जिल्ह्याला बुधवारी रात्री पावसाने चांगलेच झोडपले. जिल्ह्यातील ६० मंडळात पावसाने मध्यम दमदार ते जोरदार हजेरी लावली. यात ३५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील १०  मंडळात १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला. उस्मानाबाद  जिल्ह्यातील ३१ मंडळात हलका, मध्यम, दमदार ते जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील सहा मंडळात अतिवृष्टी झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील ६, बीड जिल्ह्यातील ३८, जालना जिल्ह्यातील ८ मंडळात हलका, मध्यम पाऊस झाला. या तीनही जिल्ह्यातील बहुतांश मंडळात पावसाची उसंत पाहायला मिळाली.  परभणी, हिंगोली जिल्ह्यात  पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु, ढगाळ हवामान आणि वेगाचे वारे वाहत आहेत. नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सलग पाऊस होत असल्याने खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.

विदर्भात कामे खोळंबली वऱ्हाडात रोज होत असलेल्या पावसामुळे सोंगणी केलेले सोयाबीन पूर्णतः वाया जाण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांनी रचलेल्या सुड्यांमधून आता कोंब बाहेर निघू लागले आहेत. काही ठिकाणी अद्यापही शेतांमध्ये पावसाचे पाणी, मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने सोंगणी केलेले सोयाबीन वाळवण्‍यासाठी कुठलीही सोय शिल्लक राहिलेली नाही. अकोला, बुलडाणा, वाशीमसह सर्वच जिल्ह्यात ऑगस्टपासून सातत्याने पाऊस पडत आहे. सप्टेंबर महिन्यात सोयाबीन हंगाम सुरु होत असतानाच पाऊस झाला. त्यानंतर चालू महिन्यात पाऊस झाला. वाशीम जिल्हयात मंगरूळपीर, रिसोड, मानोरा, मालेगाव या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सोंगलेल्या सोयाबीनचे संपूर्ण पीक वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी करून ते सुकावे या उद्देशाने तसेच ठेवले होते. काहींनी सुडी लावून ठेवल्या. अशातच हा पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले.

बुधवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटर (स्रोत - हवामान विभाग) : कोकण ः मालवण ८९, गुहागर ६३, वाडा ६०, संगमेश्वर ६०, दोडामार्ग ७५, माणगाव २०, पेण ३६, रोहा २४, खेड २३, कणकवली ४५, कुडाळ २५, सावंतवाडी ४०, भिवंडी २०, उल्हासनगर २०.

मध्य महाराष्ट्र : आजरा ३६, चंदगड २८, वेल्हे ३०, पाटण २५, अक्कलकोट ३६, माढा २२.२, मंगळवेढा २७, मोहोळ २४, पंढरपूर ३१,सोलापूर ५९.६.

मराठवाडा : देवणी ८०, उमरगा ७७, अहमदपूर ३२, जळकोट ४१, लातूर ५५, रेणापूर २५, शिरूर अनंतपाळ ६०, देगलूर ३१, मुखेड ३०, औसा ७२, चाकूर ७२, लोहारा ५५, तुळजापूर ४०, लातूर ७४.८, बाभळगाव ७७.३, कासारखेडा ८०, चिंचोली ७४.३, कन्हेरी ७३.५, औसा ८४.३, भादा ७०.५, किनी ७८.५, बेलकुंड ८१.८, शिरुर ताजबंद ६६, पानचिंचोली ७५.३, निटूर ८५.५, औराद ८३, नागलगाव ८४.५, नळगीर ७३, मोघा ८६.३, चाकूर ६६, नळेगाव ७७, आष्टा ७७.८, शेळगाव ८३.३, देवणी ८१, बोरोळ ८८.५, शिरुर अनंतपाळ ६६, साकोळ ९३.८, हिसामाबाद ७८.३, मुळज ९४.३, मुरूम ९८.५, सलगरा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com