agriculture news in Marathi, state award function will be soon, Maharashtra | Agrowon

राज्य कृषी पुरस्कार वितरणाची जय्यत तयारी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे  : कृषी खात्याचे राज्यस्तरीय शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याची कृषी आयुक्तालयात जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पुरस्कारार्थी शेतकऱ्यासाठी एक संपर्काधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. 

पुणे  : कृषी खात्याचे राज्यस्तरीय शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याची कृषी आयुक्तालयात जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पुरस्कारार्थी शेतकऱ्यासाठी एक संपर्काधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून सतत लांबणीवर पडलेले कृषी खात्याचे पुरस्कार वाटण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. १४ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलमधील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कृषी व फलोत्पादन क्षेत्रात राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जातात. कृषी खात्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील पुरस्काराने गौरविले जाते. 

कृषी खात्याच्या या पुरस्कारांबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असते. मात्र, २०१५ आणि २०१६ चे पुरस्कार वाटले गेले नव्हते. कृषी सचिव एकनाथ डवले यांनीच पुढाकार घेत पुरस्काराच्या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी हालचाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सोहळ्यासाठी राज्यपाल सी विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. नवे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी पदभार घेताच सर्वांत आधी या सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती घेतली. 

आयुक्तांनी बालेवाडीत जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कृषिमंत्री चंद्रकांतदादा पाटील व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे दोघेही या सोहळ्याचे निमंत्रक आहेत. याशिवाय अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे आणि मदत व पुनर्वसनमंत्री दिलीप कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

२०१५ मधील ५५ आणि २०१६ मधील ५७ पुरस्कारार्थी शेतकरी या सोहळ्यासाठी उपस्थित असतील. त्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक पुरस्कारार्थीला थेट गावापासून बालेवाडीपर्यंत आणि तेथून पुन्हा गावापर्यंत एक संपर्काधिकारी दिला आहे. पुरस्कारार्थी शेतकरी १३ फेब्रुवारीला दुपारी पुण्यात दाखल होणार आहेत. कृषिमंत्री, कृषिसचिव तसेच कृषी आयुक्तांसोबत शेतकरी स्नेहभोजन घेणार आहेत. राज्यपालांच्या हस्ते मानचिन्ह, शाल, श्रीफळ तसेच साडीचोळी, कुंकवाचा करंडा देत शेतकऱ्याचा सपत्नीक सत्कार केला जाणार आहे. तसेच, विविध पुरस्कारानुसार २५ ते ७५ हजारांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

इतर बातम्या
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...