agriculture news in marathi, State Bank will give loan to four factories | Agrowon

सोलापूर : राज्य बॅंक देणार चार कारखान्यांना कर्ज

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 मे 2019

सोलापूर : केंद्र शासनाने सॉफ्ट लोन घेण्यास साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य बॅंकेने राज्यातील साखर कारखान्यांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना राज्य बॅंकेकडून कर्ज मिळणार आहे. या कर्जातून प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या रकमा प्राधान्याने अदा केल्या जातील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.  

सोलापूर : केंद्र शासनाने सॉफ्ट लोन घेण्यास साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य बॅंकेने राज्यातील साखर कारखान्यांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना राज्य बॅंकेकडून कर्ज मिळणार आहे. या कर्जातून प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या रकमा प्राधान्याने अदा केल्या जातील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.  

यंदा साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले, पण त्याला उठाव नाही. त्यातच गेल्या वर्षीचीही साखर शिल्लक आहे. साखरेची विक्री होऊ न शकल्याने कारखान्यांना शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे देणे अडचणीचे झाले आहे. साखर विक्री होत नसल्याने कारखान्यांनी सॉफ्ट लोन घेण्यास परवानगी मागितली होती. केंद्र शासनाने ती परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे ४२ बॅंकांनी राज्य बॅंकेकडे कर्जाची मागणी केली. 

केंद्र सरकारनेही बाजारातील साखरेची परिस्थिती पाहून त्यास मान्यता दिली. या कर्जापैकी एका वर्षाचे व्याज हे केंद्र सरकार भरणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याला ४१ कोटी ९३  लाख, लोकमंगल शुगर इथेनॉल भंडारकवठेला १६ कोटी ५८ लाख, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याला १३ कोटी ५३ लाख आणि संत दामाजी सहकारी कारखान्याला ११ कोटी ७ लाख रुपये कर्ज मंजूर झाले. पण या पैशातून कारखान्यांनी एफआरपीसाठीची तरतूद अधिक केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काही प्रमाणात का होईना एफआरपीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. या कारखान्यांना आता मेपर्यंत कर्ज उचलण्यास साखर आयुक्तांनी मुदत दिली.


इतर बातम्या
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या...
दीडपट 'एमएसपी' म्हणजे निव्वळ धूळफेक :...पुणे: मोदी सरकारने खरिपासाठी जाहीर केलेल्या किमान...
मॉन्सून कर्नाटकात आज धडकणारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट...पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...