राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ४००० रुपये

राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ४००० रुपये
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ४००० रुपये

पुण्यात प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये पुणे ः खरिपातील वांग्याचे उत्पादन सुरू झाले असून, बाजारपेठेतील आवकदेखील वाढली आहे. गुरुवारी (ता. २५) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याच्या विविध वाणांची सुमारे १० टेम्पो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला सुमारे १०० ते २०० रुपये दर होता. सध्या वांग्याची आवक वाढली असून, मागणी घटली आहे. गेल्या महिन्यांत हेच दर २०० ते २५० रुपये एवढे होते.

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २४) वांग्याची आवक ३३२ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ११५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २३) वांग्याची आवक ३२५ क्विंटल झाली. तिला १५०० ते २७५० रुपये असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २२५० रुपये होता. सोमवारी (दि. २२) वांग्याची आवक २२२ क्विंटल झाली. तिला ९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १६०० होता. शनिवारी (ता. २०) वांग्याची आवक १६६ क्विंटल झाली. तिला १५०० ते ३५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२५० होता. शुक्रवारी (ता. १९) वांग्याची आवक १७१ क्विंटल झाली. तिला ८०० ते २५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रुपये होता. गुरुवारी (ता. १८) वांग्याची आवक १६७ क्विंटल झाली. तिला ९०० ते २५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १८५० रुपये होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत वांग्याची आवक सर्वसाधारण होती. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे वांग्याच्या बाजारभावतही चढउतार दिसून आली. चालू महिन्यात वांग्याचे दर मागील महिन्याच्या आवकेच्या तुलनेत घटल्याचे दिसून आले.

सोलापुरात प्रतिक्विंटल २५०० रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात वांग्याला मागणी होती. वांग्याची आवक तुलनेने कमी होती. पण मागणीमुळे वांग्याचे दर टिकून होते, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात वांग्याची रोज २० ते ४० क्विंटलपर्यंत आवक राहिली. वांग्याची सगळी आवक आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक अगदीच कमी होती. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. या सप्ताहापूर्वीही वांग्याची आवक ३० ते ५० क्विंटलपर्यंत होती. पण मागणीही कायम होती. वांग्याला किमान ४०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर होता. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातही वांग्याची आवक तशी जेमतेमच राहिली. पण दर टिकूनच होते. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये असा दर होता. १०० ते २०० रुपयांच्या फरकाने चढ-उतार वगळता दर टिकून होते. येत्या आठवड्यातही काहीशी अशीच परिस्थिती राहण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

जळगावात प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महिनाभरापासून वांग्यांचे दर कमी अधिक होत आहेत. दर अपेक्षित मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी (ता. २५) १६ क्विंटल आवक झाली. दर ८०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. जूनच्या अखेरीस दर टिकून होते. परंतु, पावसाने अनेक भागांत हजेरी लावल्यानंतर आवक वाढली. उठाव हवा तसा नसल्याने दरात चढउतार सुरू झाले. आवक पाचोरा, जामनेर, एरंडोल, जळगाव, यावल या भागांतून होत आहे. लहान हिरव्या काटेरी वांग्यांना बऱ्यापैकी उठाव असतो, असे सांगण्यात आले.

परभणीत प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २५) वांग्याची ६० क्विंटल आवक होती. वांग्याला प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, इटलापूर, बोरवंड, कोक आदी गावांतून वांग्याची आवक होत आहे. गेल्या महिनाभरात   वांग्याची ३० ते ६० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते २५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २५) वांग्याची ६० क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो २० ते ३० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

अकोल्यात प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये अकोला ः स्थानिक बाजारात वांग्याच्या आवकेत मोठी वाढ झाल्याने गुरुवारी (ता. २५) दर कमालीचे कमी झाले. ८०० ते १००० रुपयांदरम्यान वांग्यांची विक्री झाली. आवक वाढली व मागणी कमी असल्याने दरात घसरण झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. किरकोळ बाजारात वांगी २० ते ३० रुपये प्रतिकिलोने विकली जात होती. येथील जनता भाजी बाजारात अकोल्यासह इतर जिल्ह्यांतून वांग्यांची आवक होत आहे. गुरुवारी ४० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. दुय्यम दर्जाची वांगी ८०० ते ९०० रुपयांदरम्यान विक्री झाले. उत्तम दर्जाची वांगी १००० ते १२०० रुपयांदरम्यान प्रतिक्विंटल विक्री झाले.

सांगलीत प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये सांगली ः येथील शिवाजी मंडईत वांग्याची आवक कमी-अधिक होत असून, गुरुवारी (ता. २५) वांग्याची २०० ते २५० बॉक्स (एक बॉक्स २० ते २५ किलोचे) आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंडईत वांग्याची आवक आष्टा, दूधगाव, कवठेपिरान, तुंग, मिरज, बावची, देवराष्ट्रे, कासेगाव, पलूस, कुंडल, या भागातून येते. बुधवारी (ता. २४) वांग्याची १५० ते २०० बॉक्सची आवक झाली होती. वांग्यास प्रति दहा किलोस २५० ते ३५० रुपये असा दर होता.  मंगळवारी (ता. २३) वांग्याची २०० ते २५० बॉक्सची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस ३२० ते ३८० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. २२) वांग्याची १८० ते २२५ बॉक्सची आवक झाली होती. वांग्यास प्रति दहा किलोस २८० ते ३३० रुपये असा दर मिळाला. गत सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात वांग्याची आवक ५० ते ८० बॉक्सने कमी झाली असून, वांग्याच्या दरात प्रतिकिलोस ८ ते १० रुपयांनी दर वधारले असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली.

नगरला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) वांग्याला प्रतिक्विंटल पाचशे ते दोन हजार रुपये सरासरी बाराशे पन्नास रुपये दर मिळाला. आज वांग्याची ३९ क्विंटलची आवक झाली. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० ते ६० क्विंटल प्रतिदिन वांग्याची आवक होत असते. पाऊस नसल्याचा वांग्याच्या आवकेवर ही परिणाम होताना दिसत आहे. १८ जुलै रोजी ३६ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २००० रुपये सरासरी बाराशे ५० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. ११ जुलै रोजी ४८ क्विंटलची आवक कोण ५०० ते २००० रुपये व सरासरी बाराशे ५० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. ४५ क्विंटल आवक होऊन ५०० ते ३००० व सरासरी १७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. २७ जून रोजी ३६ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ४००० व सरासरी बावीसशे पन्नास रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला. २० कालची ओळखून ५०० ते ३००० व सरासरी ७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ७०० ते १००० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) वांगीची ६१ क्‍विंटल आवक झाली. या वांग्यांना ७०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये ९ जुलैला ५२ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांना १३०० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० जुलैला वांग्याची आवक २९ क्‍विंटल तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ११ जुलैला ४५ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांना १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३ जुलैला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांचा दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १५ जुलैला आवक ४८ क्‍विंटल झाली. या वांग्याला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १६ जुलैला ७० क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ९०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १७ जुलैला वांग्याची आवक ३८ क्‍विंटल तर दर १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १८ जुलैला ८८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २४ जुलैला ३९ क्‍विंटल वांग्यांची आवक झाली. या वांग्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com