agriculture news in marathi, State budget, Agriculture minister Pandurang Phundkar | Page 2 ||| Agrowon

शेतीसह सर्वांगिण विकास साधणारा अर्थसंकल्प : कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 मार्च 2018

मुंबई : राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प  शेती क्षेत्रासह राज्याच्या एकूणच विकासाला चालना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे व्यक्त केली. 

मुंबई : राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प  शेती क्षेत्रासह राज्याच्या एकूणच विकासाला चालना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे व्यक्त केली. 

श्री. फुंडकर म्हणाले की, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत असलेल्या प्रकल्पांना ८ हजार २३३ कोटी रुपयांची तरतूद व जलयुक्त शिवार योजनेसाठी १ हजार ५०० कोटी अशी भरीव तरतूद  तसेच सेंद्रीय व शाश्वत शेतीला चालना मिळण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.  सर्वसामान्य माणसाशी संबंधित योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करुन अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्र कसा प्रगतीकडे जात हे दाखवून दिले आहे. 

महाराष्ट्राच्या प्रगतीशील वाटचालीत मोलाचा योगदान देणारा अर्थसंकल्प असून मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या दूरदृष्टीचे द्योतक या अर्थसंकल्पातून दिसते. विदर्भात संत्रा उत्पादन वाढ व प्रक्रियेसाठी सायट्रस इस्टेटची स्थापना ही महत्वपूर्ण योजना, त्याचप्रमाणे फळबाग योजना आणि वनशेती व पडीक जमिनीवरील वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणारी योजनांचा समावेश करण्ययात आला आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी तरतूद केल्याने शेतक-याला न्याय देणारा, शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द असणारा आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला थेट शासनाशी जोडणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रियाही फुंडकर यांनी व्यक्त केली.


इतर ताज्या घडामोडी
शासन निर्णय असूनही बँकानी पीकविमा रोखला...बुलडाणा ः गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या...
यवतमाळ जिल्ह्यात अडीच हजार...यवतमाळ ः खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना...
नागपूर, गडचिरोलीच्या जिल्हा पुरवठा...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या...
मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी...औरंगाबाद : कायम दुष्काळ व पाणीतुटीचा सामना...
टोळधाड नियंत्रणासाठी ड्रोनच्या...मुंबई : राज्यात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील...
खरिपासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करा...मुंबई : येत्या खरीप हंगामासाठी बँकांनी...
धान्य, चाऱ्यासाठी बाजरीबाजरी हे पीक पाण्याच्या ताणाला सहनशील आणि...
बुलडाण्यात ३० हजारांवर शेतकऱ्यांचे आधार...बुलडाणा  : राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १००० ते १३०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भरघोस मका उत्पादनासाठी सुधारीत पद्धतीमहाराष्ट्रात रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात मका...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
तंत्र खरीप ज्वारी लागवडीचे..पेरणी १५ जून ते १० जूलै दरम्यान करावी. पेरणीसाठी...
मूग आणि उडीदाची सुधारीत पध्दतीने लागवडजमिनीत वापसा येताच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात (१५...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...