agriculture news in marathi, state cabinet expansion on today, mumbai, maharashtra | Agrowon

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

 मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही दिवस चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर आज (ता. १६) होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून ५-६ तर शिवसेनेकडून २ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला होते. या वेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे जाहीर केले. शपथविधी सोहळ्याची तयारी राजभवनावर सुरू आहे. 

 मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही दिवस चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर आज (ता. १६) होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून ५-६ तर शिवसेनेकडून २ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला होते. या वेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे जाहीर केले. शपथविधी सोहळ्याची तयारी राजभवनावर सुरू आहे. 

येत्या सोमवारपासून (ता. १७) विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद देण्यास भाजपमधील निष्ठावंतांचा विरोध असल्याची चर्चा आहे. मात्र, विखे पाटील व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे मंत्रिपद निश्चित असल्याचे समजते. भाजपच्या कोट्यातून आमदार अनिल बोंडे व संजय कुटे यांच्यापैकी एक तर शिवाजीराव नाईक व अतुल सावे यांच्यापैकी एक अशा दोघांना संधी मिळू शकते. तसेच रामदास आठवले यांच्या रिपाइंला एक मंत्रिपद मिळू शकेल, असा अंदाज आहे. आरपीआयतर्फे अविनाश महातेकर यांच्या नावाची चर्चा आहे. 

शिवसेनेतही मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त करून शिंदे यांनी काही आमदारांसह मातोश्रीवर शक्तिप्रदर्शन केले होते. शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास रामदास कदम, सुभाष देसाई व दिवाकर रावते यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना उपमुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरण्याची शक्यता कमी आहे.

शिवसेनेच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त असून राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना ते मिळू शकते, अशी चर्चा आहे. दोन मंत्रिपदे मिळावीत, असा शिवसेनेचा आग्रह आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येते.
 

इतर ताज्या घडामोडी
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...