Agriculture news in marathi, In the state, the cost of bean is Rs 1000 to 5000 | Agrowon

राज्यात घेवडा १००० ते ५००० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

सोलापुरात सर्वाधिक २००० रुपये
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवड्याची आवक खूपच कमी राहिली. पण त्याला मागणी चांगली आहे. दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

सोलापुरात सर्वाधिक २००० रुपये
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवड्याची आवक खूपच कमी राहिली. पण त्याला मागणी चांगली आहे. दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

घेवड्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २००० रुपये इतका दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवड्याची आवक प्रतिदिन केवळ ४ ते ५ क्विंटलपर्यंत राहिली. घेवड्याची आवक स्थानिक भागातूनच झाली. मागणीत सातत्य राहिल्याने दर स्थिर होते. घेवड्याला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवकेत काहीसा चढ-उतार राहिला. पण दर जैसे थे राहिले. या आठवड्यात प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये दर होता.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही काहीशी अशीच परिस्थिती होती. घेवड्याची प्रतिदिन ५ ते ८ क्विंटल आवक झाली. या आठवड्यात घेवड्याला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर होता. घेवड्याच्या दरात २०० ते ४०० रुपयांच्या फरकाचा चढ-उतार वगळता दर टिकून आहेत.

औरंगाबादेत १४०० ते २००० रुपये 

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २६) घेवड्याची (वालशेंग) आवक ३ क्‍विंटल झाली. त्याला १४०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये घेवड्याची (वालशेंग) आवक जवळपास स्थिर आहे. ११ सप्टेंबरला ४ क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४ सप्टेंबरला ३ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी घेवड्याचे दर १८०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १६ सप्टेंबरला ४ क्‍विंटल आवक झाली. दर १५०० ते २३०० रुपये प्रतिक्‍वंटलपर्यंत मिळाला. 

१८ सप्टेबर रोजी ४ क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याचे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २१ सप्टेंबरला आवक ४ क्‍विंटल, तर दर १८०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २३ सप्टेंबरला ४ क्‍विंटल आवक झाली. दर १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला. २४ सप्टेंबरला घेवड्याची आवक ४ क्‍विंटल, व दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २५ सप्टेंबरला बाजारात घेवड्याची आवकच झाली नसल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नाशिकमध्ये ४००० ते ५००० रुपये

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २५) घेवड्याची आवक ७५२ क्विंटल झाली. त्याला प्रतिक्विंटल किमान ४००० ते कमाल ५००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजारपेठेत आवक वाढली असून दर घटल्याचे दिसून आले. 

मंगळवारी (ता. २४) घेवड्याची आवक ३८८ क्विंटल झाली. त्यास ४४०० ते ५५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० रुपये होता. सोमवारी (ता. २३) घेवड्याची आवक ३०५ क्विंटल झाली. त्यास ४७०० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये होता. रविवारी (ता. २२) आवक ३९५ क्विंटल झाली. त्या वेळी ५००० ते ६००० असा दर मिळाला. सर्वसाधारण ५५०० दर होता.

शनिवारी (ता. २१) घेवड्याची आवक ३५१ क्विंटल झाली. त्यास ४००० ते ७२०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण ५७०० रुपये दर होता. शुक्रवारी (ता. २०) घेवड्याची आवक ३७४ क्विंटल झाली. त्यास ४५०० ते ६०००, असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० होता. गुरुवारी (ता. १९) घेवड्याची आवक ४२६ क्विंटल झाली. त्यास ५५०० ते ७०००असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६५०० होता. हा सप्ताहात मिळालेला सप्ताहात सर्वोच्च भाव होता.

मागील आठवड्यापासून बाजार समितीत घेवड्याची आवक हळूहळू वाढत असल्याचे दिसून आले आहे. आवकेप्रमाणे मागणीबरोबर सरासरी बाजारभावात चढ उतार होत आहे, अशी माहिती मिळाली.

जळगावात २५०० ते ४००० रुपये

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेवड्याची रोज आवक होत नाही. फक्त शनिवारी किंवा गुरुवारी आवक होत आहे. स्थानिक भागात लागवड नसल्याने त्याची आवक स्थानिक क्षेत्रातून होत नसल्याची स्थिती आहे. 

बाजार समितीमधील काही अडतदार नाशिक येथून त्याचा पुरवठा करून घेतात. मागील आठवड्यात घेवड्याला प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाला होता. काही अडतदारांनी मिळून ६० किलो घेवड्याचा पुरवठा नाशिक येथील अडतदारांकडून करून घेतला होता. यंदा अतिपाऊस व इतर कारणांनी घेवड्याचे उत्पादन नाशिक व लगतच्या भागात कमी झाले आहे. यामुळे घेवड्याचे दर मागील दोन महिन्यांपासून टिकून आहेत. जळगाव व लगतच्या भागात घेवड्याचे मोजके ग्राहक आहेत. यामुळे मोजकीच मागणी करून त्याची विक्री केली जाते. दरात फारसे चढउतार होत नसल्याचे सांगण्यात आले.

परभणीत १८०० ते २००० रुपये

परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २६) घेवड्याची ४ क्विंटल आवक होती. त्याला (वाल) प्रतिक्विंटल १८०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून घेवड्याची (वाल) आवक होत आहे. मागील दोन आठवड्यांपासून मार्केटमधील घेवड्याची आवक कमी झाली आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी घेवड्याची ४ ते १० क्विंटल आवक झाली. त्या वेळी सरासरी प्रतिक्विंटल ८०० ते २००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २६) घेवड्याची ४ क्विंटल आवक झाली. त्याच्या घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १८०० ते २००० रुपये होते. किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये 

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस घेवड्यास क्विंटलला तीन हजार ते चार हजार रुपये क्विंटल इतका दर मिळत आहे.  गेल्या काही दिवसापासून घेवड्याच्या‌आवकेत घट दिसत आहे. 

बाजार समितीत बेळगाव सीमा भागातून घेवड्याची आवक होते. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विविध भाजीपाल्याचे नुकसान झाले. यात वेलवर्गीय भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी घटलेली घेवड्याची आवक अजूनही पूर्वपदावर आली नसल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

गेल्या पंधरवड्यापासून घेवड्याचे दर टिकून असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. बाजार समिती सध्या बेळगाव बरोबरच चिकोडी तालुक्यातून घेवड्याची आवक होत आहे. 

नगरमध्ये घेवड्याला १५०० ते ३००० रुपये 

 नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २६) घेवड्याची ११ क्विंटलची आवक झाली. त्याला प्रति क्विंटल १५०० ते ३००० व सरासरी दोन हजार रुपये दर मिळाला. गेल्या महिनाभरात घेवड्याची आवक आणि दरात ही सतत चढ-उतार होत आहे. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला साधारण १० ते ४० क्विंटलपर्यंत आवक होत असते. गुरुवारी ११ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला १५०० ते ३००० दर मिळाला.  १२ सप्टेंबर रोजी १९ क्विंटलची आवक होऊन १००० ते २००० व सरासरी दीड हजार रुपयांचा दर मिळाला. १९ सप्टेंबर रोजी ११ क्विंटलची आवक होऊन १००० ते अडीच हजार रुपये, तर सरासरी १७५० रुपयांचा दर मिळाला. 

२९ आॅगस्ट रोजी नऊ क्विंटल आवक होऊन २००० ते ४००० व सरासरी तीन हजार रुपयांचा दर मिळाला. १६ ऑगस्ट रोजी ९ क्विंटलची आवक होऊन चार हजार ते  सहा हजार, तर  पाच हजार रुपयांचा सरासरी दर मिळाला. २२ ऑगस्ट रोजी तीन क्विंटल आवक झाली. दर ६०००   ते ७००० व सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...