agriculture news in Marathi state cread problems in PM-Kisan Maharashtra | Agrowon

केंद्राच्या सन्मान योजनेला राज्य सरकारकडून आडकाठी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी देत दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

अमरावती ः लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी देत दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना मिळणारा हा दोन हजार रुपयांचा निधी खात्यात जमा होण्यास आडकाठी आणल्याचा आरोप माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. 

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान योजनेचा निधी वळता करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार प्रक्रिया करुन देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले. परंतू काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन पडताळणी केली असता राज्य सरकारने निधी थांबविल्याचा संदेश पोर्टलवर दिसत आहे. 

याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर कैलाससिंग राजपूत या शेतकऱ्याचे पोर्टलवरील ऑनलाईन कारवाईची माहिती घेण्यात आली. त्यावेळी देखील राज्य सरकारकडून पैसे रोखण्यात आल्याचा मॅसेज डिस्प्ले झाला, असे डॉ. बोंडे यांनी सांगीतले. या संदर्भाने कृषी आयुक्‍तांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उपाययोजना सुरु असल्याचे सांगण्यात आले, असेही डॉ. बोंडे म्हणाले. 

अमरावतीत वीस हजार शेतकरी वंचित 
अमरावती जिल्हयात वीस हजारावर शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा निधी मिळाला नाही. अमरावती जिल्हा बॅंकेत ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे, त्याच ठिकाणी ही अडचण निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्हयातही अशाप्रकारची समस्या निर्माण झाल्याचा दावा डॉ. बोंडे यांचा आहे. दरम्यान या संदर्भाने कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...