शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात  पाच हजार कृषिमित्र, कृषिताईंची नियुक्ती

शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात  पाच हजार कृषिमित्र, कृषिताईंची नियुक्ती
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात  पाच हजार कृषिमित्र, कृषिताईंची नियुक्ती

नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी तसेच त्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्यात पाच हजार कृषिमित्र व कृषिताईंची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांना निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली. या कृषिमित्र व कृषिताईंना प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे ३०० कुशल प्रशिक्षकांना अमरावती येथे प्रशिक्षण देण्यात आले असून, ते गावोगावी जाऊन या दोघांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देणार आहेत. या कृषिमित्र व कृषिताईंना १२०० रुपये मासिक वेतन देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

हे मास्टर्स ट्रेनर्स बहुविध पीकपद्धती, गोपालन, कुक्कुटपालन, हवामान बदलानुसार पीकनिवड आदींबाबत माहिती देणार असल्याचे बोंडे यांनी सांगितले. याशिवाय या मास्टर्स ट्रेनर्सना आर्ट आॅफ लिव्हिंगचेही प्रशिक्षण देण्यात आले असून, ते याचे प्रशिक्षण कृषिमित्र व कृषिताईंना देणार आहे. हे मित्र व ताई शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करतील, असे बोंडे म्हणाले.

पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांपुरता देय असलेला या प्रकल्पाचा लाभ आता २ ते ५ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार असल्याचे बोंडे यांनी सांगितले.

विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि हवामानबदलास अतिसंवेदनशील असणारी ४ हजार २१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदी खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ अशा एकूण ५ हजार १४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामान अनुकूल कृषी प्रकल्प) राबविण्यात येत आहे. प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्तिक लाभाच्या बाबींसाठी अर्थसाह्याचे प्रमाण ५० वरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच, २ ते ५ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ६५ टक्के अर्थसाह्य दिले जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकरी गटांना ६० टक्क्यांच्या मर्यादेत अनुदान दिले जाईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com