Agriculture news in Marathi, state in french bean per quintal 800 to 5500 rupees | Agrowon

राज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५०० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये

सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवड्याला चांगला उठाव मिळाला. पण घेवड्याची आवक अगदीच कमी राहिली. पण मागणीत सातत्य असल्याने दरातील तेजी कायम राहिली. घेवड्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवड्याची रोज १ ते २ क्विंटल अशी आवक राहिली. घेवड्याची आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक झालीच नाही. आवक आणि मागणीतील तफावतीमुळे घेवड्याला चांगला उठाव मिळाला. या आठवड्यात घेवड्याला प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये दर मिळाला. या आधीच्या आठवड्यातही प्रतिदिन २ ते ५ क्विंटल अशी आवक झाली. पण दरही किरकोळ चढ-उतार वगळता स्थिर राहिले. किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४७०० रुपये असा दर मिळाला. ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यातही आवकेचे प्रमाण काहीसे असेच राहिले. प्रतिदिन २ ते ३ क्विंटल इतके होते. तर घेवड्याला प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ३८०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाला. आवकेचे हे प्रमाण वरचेवर कमीच होते आहे. त्यामुळे त्यांच्या दरातील तेजी टिकून आहे.

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४) घेवड्याची आवक ३५३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ४००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. ३) घेवड्याची आवक ४९७ क्विंटल झाली. त्यास ३००० ते ४००० रुपये असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५०० रुपये होता. सोमवारी (दि. २) घेवड्याची आवक ५७९ क्विंटल झाली. त्यास १८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० रुपये होता. शनिवारी (ता. ३१) घेवड्याची आवक ४०६ क्विंटल झाली. त्यास २००० ते ३००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण २५०० रुपये दर होता.शुक्रवारी (ता. ३०) घेवड्याची आवक ३०५ क्विंटल झाली. त्यास २००० ते ३००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० रुपये होता. गुरुवारी (ता. २९) घेवड्याची आवक ३६२ क्विंटल झाली. त्यास २४०० ते ४००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५०० रुपये होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत घेवड्याची आवक हळूहळू वाढत असल्याचे दिसून आले आहे. आवकेप्रमाणे मागणीबरोबर सरासरी बाजारभावात चढ-उतार होत आहे.

परभणीत प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ५) घेवड्याची १० क्विंटल आवक होती. घेवड्याला प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसर तसेच पुणे जिल्हा, कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून घेवड्याची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी घेवड्याची ७ ते १० आवक झाली. त्या वेळी सरासरी प्रतिक्विंटल ८०० ते २५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ५) घेवड्याची १० आवक झाली असताना, घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने सुरू होती, असे   व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ८०० ते १६०० रुपये
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ५) घेवडा (वाल शेंगा) ११ क्‍विंटल आवक झाली. या घेवड्याला ८०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. गत पंधरवड्यात घेवड्याच्या आवकेत व दरात चढउतार पाहायला मिळाला. २० ऑगस्टला ४ क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याचे दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. २४ ऑगस्टला १० क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २६ ऑगस्टला घेवड्याची आवक ८ क्‍विंटल, तर दर १८०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २७ ऑगस्टला १२ क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याला १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २८ ऑगस्टला ३ क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याचे दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३ सप्टेंबरला १० क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याला ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४ सप्टेंबरला ७ क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याला ६०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

जळगावात प्रतिक्विंटल ५५०० रुपये
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील दोन महिन्यांपासून घेवड्याची आवक रोडावली आहे. मागील महिनाभरात फक्त चार दिवस आवक झाली. काही अडतदार किंवा खरेदीदार नाशिक येथून घेवडा मागवून घेत आहेत. स्थानिक क्षेत्रात त्याची अपवाद वगळता लागवडच नसल्याने आवक शून्य आहे. गुरुवारी (ता. ५) कुठलीही आवक झाली नाही. परंतु मागील आठवड्याच्या सुरवातीला एक क्विंटल आवक झाली होती. त्याला ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. या आठवड्यात सोमवारपासून (ता. २) कुठलीही आवक घेवड्याची झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

साताऱ्यात प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये
सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी काळा घेवड्याची ३७ क्विंटल आवक झाली. काळ्या घेवड्यास क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये असा दर मिळाला आहे. काळा घेवड्याच्या आवकेत वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. कोरेगाव, सातारा, खटाव तालुक्यांतून काळ्या घेवड्याची सर्वाधिक आवक होत आहे. २९ ऑगस्टला काळ्या घेवड्याची १८ क्विंटल आवक होऊन क्विंटल ३००० ते ४००० रुपये असा दर मिळाला आहे. २५ ऑगस्टला काळ्या घेवड्याची ११ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ३५०० ते ४५०० रुपये असा दर मिळाला होता. १८ ऑगस्टला काळ्या घेवड्याची २६ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ४००० ते ४५०० रुपये असा दर मिळाला होता. काळ्या घेवड्याची ५० ते ६० रुपयेप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपये
कोल्हापूर ः येथील बाजार समितीत घेवड्यास दहा किलोस २०० ते ४५० रुपये इतका दर मिळत आहे. घेवड्याची आवक गेल्या काही दिवसांमध्ये खूपच कमी झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. घेवड्याची रोज दहा ते वीस पाट्या इतकी आवक झाली. गेल्या काही दिवसांमध्ये या भावात पूरपरिस्थिती असल्यामुळे अनेक भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. यातून अद्याप शेतकरी सावरलेला नाही. परिणामी, भाजीपाल्यांची आवक रोडावली आहे, असे सूत्रांनी सांगितले. अजून महिनाभर तरी घेवड्याची आवक मंदावली राहील, अशी शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली.

पुण्यात प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये
पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ५) घेवड्याची सुमारे ६ टेम्पो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला १५० ते ३०० रुपये एवढा दर होता. आवक ही प्रामुख्याने स्थानिकसह कर्नाटक राज्यातून होत असून, रविवारी कर्नाटकमधून सुमारे ३ टेम्पो आवक झाली होती. तर स्थानिक आवक ही सुमारे २ ते ३ टेम्पो एवढी असते. सध्याचे दर हे तुलनेने वाढलेले असल्याचे आडतदारांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत केंद्रांवरील...औरंगाबाद : बाजारात हमी दरापेक्षा कमी दराने तुरीची...
ग्रामीण भागात आरोग्यसेवा द्या : भगतसिंह...नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान...
रत्नागिरी दूध संघाकडून १ कोटी २० लाख...रत्नागिरी : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील चाळीस...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगली, कोल्हापूरसाठी विशेष पॅकेज : डॉ...सांगली : ‘‘महापूराने सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे...
वीज दरवाढीबाबत चार फेब्रुवारीला हरकती...मसूर, जि. सातारा ः महावितरणचा २०.४ टक्के वीज...
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही...मेढा, जि. सातारा : नियमित कर्जफेड करणाऱ्या...
कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरितरत्न...अकोला  ः नवी दिल्ली येथील अखिल भारतीय कृषी...
अकोले तालुका गैरव्यवहार प्रकरणी तीन...नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व...
मोहोळ येथे शेतकऱ्यांनी बॅंक...मोहोळ, जि. सोलापूर : अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍...
बॅंकांनी रोखली गटशेतीची वाट :...नागपूर  ः गटशेती योजनेचे अनुदान ६०...
हवामान बदल सहनशील वाण संशोधनाला मिळणार...परभणी: बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन...
ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीयदिनी...मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत...
अल्पसंख्यांक समाजामुळे सत्ता परिवर्तन ः...मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम...
शंकरराव चव्हाण यांच्या...नांदेड ः नांदेडचे नगराध्यक्ष ते...