राज्यात गवार प्रतिक्‍विंटल १५०० ते १०००० रुपये

राज्यात गवार प्रतिक्‍विंटल १५०० ते १०००० रुपये
राज्यात गवार प्रतिक्‍विंटल १५०० ते १०००० रुपये

पुण्यात प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ४) गवारीची अवघी सुमारे ४ टेंपो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला ३०० ते ५०० रुपये दर होता. वाढत्या उन्हाळ्यामुळे गवारीच्या आवकेत घट झाली असून, गुजरात येथून १ टेंपो तर पुणे विभागातून २ ते ३ टेंपो आवक झाली होती, अशी माहिती ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली. 

अकोल्यात प्रतिक्विंटल ४००० ते ६५०० रुपये अकोला : येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी (ता. ४) गवारीला प्रतिक्विंटल ४००० ते ६५०० रुपये दर मिळाला. गवारीची आवक  ४ ते ५ क्विंटल झाली होती, अशी माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात आली. सध्या येथील बाजारात गवारीचे दर गेल्या महिनाभरापासून वाढलेले आहेत. गवारीची आवक अकोला जिल्ह्यासह लगतच्या भागातून होत आहे. गेल्या महिनाभरात दरदिवसाला एक क्विंटल ते पाच क्विंटलपर्यंत आवक झाली. साधारणतः महिनाभरापूर्वी गवारीचा दर हा ३००० ते ५००० रुपये क्विंटल होता. गुरुवारी (ता. ४) आवक ४ ते ५ क्विंटल झाली. घाऊक विक्रीचा दर प्रतिकिलो ६० ते ९० रुपये किलोपर्यंत होता. आगामी काळात आणखी काही दिवस या दरांमध्ये उतार होण्याची शक्यता नसल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ६००० ते ७८०० रुपये  नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ३) गवारीची आवक ३५ क्विंटल झाली होती. गवारीला प्रतिक्विंटल ६००० ते ७८०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६७५० रुपये होते. आठवड्यात झालेली ही सर्वोच्च आवक ठरली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २) गवारीची आवक २५ क्विंटल झाली. तिला ६००० ते ७५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७००० रुपये होता. सोमवारी (ता. १) गवारची आवक १० क्विंटल झाली. तिला ७००० ते ८५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण सर ८००० मिळाला. शनिवारी (ता. ३०) गवारीची आवक १८ क्विंटल झाली. तिला ७००० ते ८५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८००० होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत गवारीची आवक सर्वसाधारण होती. गेल्या तीन दिवसांत आवक वाढली असून, त्यानुसार दर ठरत आहे. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढ-उतार दिसून आली.

सोलापुरात प्रतिक्विंटल १५०० ते ९००० रुपये सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची आवक खूपच कमी झाली, पण मागणी असल्याने दरातील तेजी टिकून राहिली. गवारला प्रतिक्विंलला किमान १५०० रुपये, सरासरी ७००० रुपये आणि सर्वाधिक ९००० रुपये असा दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची आवक रोज २० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. त्यातही सलग आवक नव्हती, एक-दोन दिवसाआड अशी ही आवक होती. गवारची सगळी आवक स्थानिक भागातूनच राहिली.  या आधीच्या सप्ताहात आवक रोज जेमतेम १० ते २० क्विंटल आवक झाली. गवारला प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी ६५०० रुपये आणि सर्वाधिक ७५०० रुपये दर मिळाला. त्या आधीही मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात गवारची आवक रोज केवळ २० ते ६० क्विंटल अशी राहिली. गवारला प्रतिक्विंटलला किमान १६०० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ८००० रुपये असा दर मिळाला.

कळमणा बाजारात प्रतिक्‍विंटल ३५०० ते ४००० रुपये  नागपूर ः उन्हाळ्यामुळे भाजीपाला दरात चांगलीच तेजी आली आहे. गवार शेंगाचा देखील त्यामध्ये समावेश असून गेल्या महिन्यात २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल असा दर असलेल्या गवारीने या महिन्यात ३५०० ते ४००० रुपये क्‍विंटलचा टप्पा पार केला आहे. संरक्षित सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडूनच उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाला घेतला जातो. अशा शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक मंदावते. त्यामुळे परिणामी कळमणा बाजार समितीत भाजीपाला दरात चांगलीच तेजी आली आहे. गवार शेंगाचे दर मार्च महिन्यात २८०० ते ३२०० आणि त्यानंतर हे दर २००० ते २५०० रुपयांपर्यंत खालीदेखील आले. मार्चच्या अखेरीस मात्र दरांनी चांगलीच उंची गाठली. गवार शेंगाचे दर मार्च अखेरीस ३५०० ते ४००० रुपये क्‍विंटलवर पोचले. येत्या काळात यात आणखी तेजीचा अंदाज व्यापारी सूत्रांनी वर्तविला. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याच्या परिणामी दरातील तेजी अनुभवली जात असल्याचे सांगण्यात आले. गवारीचे किरकोळ दरही ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत पोचले आहेत.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपये कोल्हापूर : येथील बाजार समितीत गवारीस दहा किलोस ३०० ते ६०० रुपये इतका दर मिळत आहे. गवारीची दररोज ८० ते ९० पोती आवक होती. हातकणंगले शिरोळ तालुक्‍यात बरोबरच बेळगाव भागातून गवारीची आवक बाजार समितीत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून गवारीच्या आवकेत काहीशी वाढ झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. सध्या ढगाळ हवामान होत असल्याने गवारीच्या काढणीत अनियमितता आहे. दर मात्र स्थिर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. पुढील काही दिवस गवारीची हीच स्थिती कायम राहील, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल २५०० ते ७००० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ४) गवारीची ३० क्‍विंटल आवक झाली. या गवारला २५०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये १८ मार्चला १३ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ५००० ते ८००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २३ मार्चला गवारीची आवक ११ क्‍विंटल, तर दर ५००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २५ मार्चला २२ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २७ मार्चला २७ क्‍विंटल आवक झालेल्या गवारचे दर २००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३० मार्चला ३ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ६००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १ एप्रिलला ५ क्‍विंटल आवक झालेल्या गवारचे दर ५००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर ३ एप्रिलला ४ क्‍विंटल आवक झालेल्या गवारचे दर ५००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com