Agriculture news in Marathi, in the state Gawar 1200 to 6000 rupees per quintal | Agrowon

राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६००० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जुलै 2019

जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारीचे दर मागील चार-साडेचार महिन्यांपासून पाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या खाली आलेले नाहीत. गुरुवारी (ता. १८) दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ५६०० रुपये एवढा मिळाला. कूस असलेल्या गवारीची अधिक मागणी आहे. या गवारीची आवकही अधिक होते. आवक पाचोरा, जामनेर, धरणगाव, जळगाव, यावल, चोपडा या भागांतून होते. तर संकरित प्रकारच्या गवारीसही पाच हजार रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. 

जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारीचे दर मागील चार-साडेचार महिन्यांपासून पाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या खाली आलेले नाहीत. गुरुवारी (ता. १८) दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ५६०० रुपये एवढा मिळाला. कूस असलेल्या गवारीची अधिक मागणी आहे. या गवारीची आवकही अधिक होते. आवक पाचोरा, जामनेर, धरणगाव, जळगाव, यावल, चोपडा या भागांतून होते. तर संकरित प्रकारच्या गवारीसही पाच हजार रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. 

सांगलीत प्रतिक्विंटल  ५००० ते ६००० रुपये
सांगली : येथील शिवाजी मंडईत गवारीची आवक कमी अधिक होत आहे. गुरुवारी (ता. १८) गवारीची ३०० ते ३५० किलोची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस ५०० ते ६०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मंडईत सांगली जिल्ह्यातील आष्टा, वाळवा, ढालगाव, मिरज, बुधगाव, पलूस, बावची, बलवडी या भागातून आवक होते. बुधवारी (ता. १७) गवारीची २५० ते ३०० किलोची आवक झाली होती. गवारी प्रति दहा किलोस ४५० ते ५५० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. १६) गवारीची २५० ते ३०० किलोची आवक झाली होती. गवारी प्रतिदहा किलोस ४५० ते ५५० रुपये असा दर होता. सोमवारी  (ता. १५) गवारीची ३०० ते ४०० किलोची आवक झाली होती. गवारी प्रतिदहा किलोस ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. रविवारी (ता. १४) गवारीची ३५० ते ४५० किलोची आवक झाली होती. गवारी प्रतिदहा किलोस ३५० ते ४५० रुपये असा दर मिळाला. गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात गवारीची आवक ९० ते १०० किलोनी कमी झाली असून प्रतिकिलोस १० रुपयांनी दर वाढले आहेत. पुढील सप्ताहात गवारीची आवक व दर स्थिर राहतील, अशी शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.

परभणीत प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये 
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे- भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १८) गवारीची २५ क्विंटल आवक होती. गवारीला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड, कोक आदी गावांतून गवारीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी गवारीची १२ ते २५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी सरासरी प्रतिक्विंटल १५०० ते ५००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १८) गवारीची २५ क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १५०० चे २५०० रुपये होते. तर किरकोळ विक्री ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

अकोल्यात प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये
अकोला : येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी (ता. १८) गवारला १२०० ते १६०० रुपये दर मिळाला. गवारची आवक १०  क्विंटल पेक्षा झाली होती, अशी माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात आली.  येथील बाजारात गवारचे दर गेल्या दिवसांपासून कमी झाले आहेत. गवारची आवक अकोला जिल्ह्यासह लगतच्या भागातून होत आहे. गेल्या महिनाभरात दरदिवसाला ५ क्विंटल ते ८ क्विंटलपर्यंत आवक झाली. साधारणतः महिनाभरापूर्वी गवारचा दर हा २५०० ते ३५०० रुपये क्विंटल होता. गुरुवारी (ता. १८) आवक १० क्विंटल झाली. घाऊक विक्रीचा दर प्रतिकिलो ३० ते ४० रुपये किलोपर्यंत होता. आगामी काळात आणखी काही दिवस या दरांमध्ये वाढ किंवा उतार होण्याची शक्यता नसल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. इतर भाजीपाल्याच्या तुलनेत गवारचा दर कमी आहे.

पुण्यात प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये
पुणे ः गुलटेकडी येथील छत्रपती कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसाअभावी पुणे विभागातून गवारच्या आवकेत घट होत आहे. सध्या साधारणपणे चार ते पाच टेम्पो एवढी गवारची आवक होत आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे. गुरुवारी (ता. १८) गवारला प्रतिदहा किलो २०० ते ४०० रुपये दर मिळाले. मागील आठवड्यात प्रतिदहा किलो २००- ३०० रुपये दर होते. बाजार समितीत पुणे विभागातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे नगर, नाशिक या जिल्ह्यांतून आवक होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवाड्यात गवारची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरात प्रती किलोच्या पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून नगर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक या भागांतून दरवर्षी जून, जुलै महिन्यांत मोठ्या प्रमाणात आवक होते. यंदा या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यातच उन्हाळ्यातही पाणीटंचाई तीव्र होती. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी गवारच्या पिकांची लागवड केली नाही. त्याचा परिणाम बाजारातील गवारच्या आवकेत झाला असून दरात वाढ होऊ लागली आहे. पाऊस न झाल्यास या दरात आणखी वाढ होईल, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १७) गवारची आवक २१ क्विंटल झाली होती. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. १६) गवारची आवक २२ क्विंटल झाली. तिला ३००० ते ५००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० रुपये होते. सोमवारी (ता. १४) गवारची आवक १२ क्विंटल झाली. तिला १२०० ते ३००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० होते. रविवारी (ता. १४) गवारची आवक १० क्विंटल झाली. तिला १५०० ते ३५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होते. शनिवारी (दि. १३) गवारची आवक ४० क्विंटल झाली. तिला २५०० ते ४००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५०० होते. शुक्रवारी (ता. १२) गवारची आवक १० क्विंटल झाली. तिला २००० ते ४५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५०० होते. गुरुवारी (ता. ११) गवारची आवक २४ क्विंटल झाली. तिला २५०० ते ५२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३६५० होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत गवारची आवक सर्वसाधारण होती. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढ उतार दिसून आली.

सोलापुरात प्रतिक्विंटल ३५०० रुपये
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची आवक जेमतेम राहिली. पण, गवारला मागणी असल्याने त्याचे दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. गवारला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३५०० रुपये इतका दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची आवक रोज ८ ते १० क्विंटल अशी राहिली. पूर्वी हीच आवक १० ते २० क्विंटल असायची, त्यात मोठी घट झाल्याने मागणीही वाढली आहे. गवारला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवक जेमतेम १० क्विंटलपर्यंतच होती. तर दर किमान १२०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि त्या आधीही आवक साधारण २० ते ३० क्विंटलपर्यंत होती. पण दर काहीसे स्थिरच होते. त्या वेळी प्रतिक्विंटलला किमान ११०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर होता. आता मात्र आवक कमी असूनही पुन्हा तोच दर टिकून असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये
कोल्हापूर : बाजार समितीत गवारीच्या आवकेत वाढ होत आहे. गेल्या सप्ताहात गवारीची दररोज १०० ते १५० पोत्यांची आवक झाली.  गवारीस दहा किलोस २५० ते ४५० रुपये दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून गवारीचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सध्या पावसाळा असला तरी अद्यापही वातावरणात थंडी नाही. परिणामी गवारीची आवक वाढत असल्याचे सांगण्यात आले. येत्या काही दिवसांत गवारीची आवक वाढण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.


इतर बाजारभाव बातम्या
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात द्राक्ष प्रतिक्विंटल १५०० ते...परभणीत ५४०० ते ७००० रुपये परभणी येथील पाथरी...
जळगावात आले २४०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५...
सांगलीत गूळ ३२०० ते ४०४५ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १४...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबांचे दर पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नागपूरला सोयाबीन दरात सुधारण्याचा अंदाजनागपूर : बाजारात उशिरा येणाऱ्या सोयाबीनची प्रत...
पुण्यात भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट;...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये अंजीर ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वाटाण्याला २००० ते ३००० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
खानदेशात लाल कांद्याची आवक वाढलीजळगाव : खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात डाळिंब प्रतिक्विंटल १५० ते ६०००...नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सांगलीत बटाट्यास १५०० ते २२०० रुपये सांगली : विष्णूअण्णा पाटील दुय्यम बाजार आवारात...
जळगावात भरताची वांगी १६०० ते २००० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १...
नगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा कायम नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ...
नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट; दरात वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
नगर जिल्ह्यात कांदा साडेपाच हजारांवर...नगर ः गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले कांद्याचे...
पुण्यात बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कापूस दर ५१०० रुपये...जळगाव  ः शासकीय खरेदी बऱ्यापैकी सुरू...
औरंगाबादमध्ये वाटाणा १३०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात टोमॅटो ३०० ते १८०० रुपये क्विंटलपुण्यात प्रति दहा किलोस १०० ते १२० रुपये...