'नार पारचे १५ टीएमसी पाणी सरकार गुजरातला देणार'

'नार पारचे १५ टीएमसी पाणी सरकार गुजरातला देणार'
'नार पारचे १५ टीएमसी पाणी सरकार गुजरातला देणार'

नाशिक : माकप, किसान सभेच्या आंदोलनावेळी महाराष्ट्र गुजरात पाणी प्रश्नाबाबत सादरीकरण करण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार जीवा गावित यांना दिले होते. त्यानुसार अधिवेशन संपल्यावर सरकारच्या जलसंपदा विभागामार्फत प्रधान सचिव इकबालसिंग चहल यांनी सादरीकरण केले. ​महाराष्ट्राचे नार-पारच्या खोऱ्यातील १५ टीएमसी पाणी (४३४ दलघमी) गुजरातला देण्यासाठी राज्य सरकार तयार झाल्याची माहिती चहल यांनी दिली .

१५ टीएमसी पाणी तापी खोऱ्यात देण्यात येणार असल्याचे राज्य सरकार जरी सांगत असले, तरी ही भूमिका फसवी आहे, असा आक्षेप गावित, आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काॅँग्रेस पक्षाच्या जलचिंतन सेलचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी घेतला. 

जाधव म्हणाले, ''तापी खोऱ्यात महाराष्ट्राच्या वाट्याला १९१, तर गुजरातला १३८ टीएमसी पाणी मिळाले आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे फक्त ९१ टीएमसी पाणी अडले आहे. उर्वरित १०० टीएमसी पाणी गुजरातच्या उकाई धरणात वाहून जात आहे. गुजरातच्या वाट्याला १३८ टीएमसी पाणी असताना २८० टीएमसी क्षमतेचे उकाई धरण बांधले. त्यात पुन्हा नारपारचे १५ टीएमसी पाणी देऊन कागदावर तापी खोऱ्याचे पाणी वाढवून मिळणार आहे. परंतु आयंगर आयोगानुसार सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण झाल्यावर महाराष्ट्राला तापी खोऱ्यात १६ टीएमसी पाणी वाढवून देण्यात यावे, अशी शिफारस आहे.''  

महाराष्ट्र सरकार तापीचा आपला हक्क मागण्याऐवजी नारपारचे पाणी नेण्यास तयार झाले. गुजरातबरोबर सामंजस्य करार करा, अन्यथा महाराष्ट्राच्या नदीजोडला पैसा देणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली. त्यामुळे गुजरातला पाणी देण्यासाठी केंद्र सरकार व गुजरात सरकार महाराष्ट्रावर दबाव टाकत आहे, असेही ते म्हणाले.

किसान लाॅँग मार्चला यश पेठ सुरगाण्यामधील ३२ जलसंधारण प्रकल्पांना आदिवासी उपयोजनेतून निधी देण्याची मागणी गावित यांनी केली. ती मागणी चहल यांनी मान्य केली. यासाठी १००० कोटी रुपये खर्च येणार आहे. दुमीपाडा मध्यम प्रकल्पास सुप्रमा देण्याचे मान्य केले. वाल – वैतरणा लिंक या ५ टीएमसी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचना जाधव यांनी मांडली. ती देखील चहल यांनी मान्य केली. किसान सभा, माकप, जलचिंतन सेलच्या वतीने लेखी सूचना देण्यात याव्यात, असे चहल यांनी या वेळी सांगितले. औतूर माध्यम प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २०१९ पर्यंत चालू करण्याचे आदेश चहल यांनी दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com