शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

पहिली ते आठवीची परीक्षा अखेर रद्द; सरसकट पास केले जाणार

राज्यात कोरोना बाधितांचे आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार आहे.

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांचे आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार आहे. असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली.  मंत्री गायकवाड म्हणाल्या, की राज्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. पहिली ते आठवी वार्षिक मूल्यमापन याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काळात आपण ऑनलाइन, ऑनलाइन, यू-ट्यूब, गुगल या माध्यमांतून आपण शिक्षण सुरू ठेवले. पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या नाहीत. तर पाचवी ते आठवी या शाळा सुरू झाल्या. पण काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाहीत. पण विविध माध्यमांतून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता.’’ ९ वी, ११ वी बाबत लवकरच निर्णय  कोविड काळात ऑनलाइन, यू-ट्यूब, गुगल या माध्यमांतून शिक्षण सुरू होते. पण आजचा निर्णय हा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे. तर ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 

१० वीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार नव्या वेळापत्रकानुसार १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार आहे, तर १२ वीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे रोजी होणार असल्याचे राज्याच्या शिक्षण मंडळाने सांगितले आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेतल्या जातात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com