agriculture news in Marathi, state government directed, fill up all crop insurgence form, Maharashtra | Agrowon

पोर्टलवर गावे दिसत नसली तरी विमा हप्ता स्वीकारा : राज्य शासनाच्या सूचना
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे: प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी पोर्टलवर काही गावांची नावे उपलब्ध होत नसली तरी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा हप्ते बॅंकांनी भरून घ्यावेत, अशा सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. 

मंगळवारी दुपारपर्यंत राज्यातील ७६ लाख शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले होते. रात्री बारा वाजेपर्यंत हा आकडा ८० लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.  बुधवारपासून विमा तपशील भरण्याची सुविधा पोर्टलवर आता फक्त बँक व जिल्हा सहकारी बँकांकरिताच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

पुणे: प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी पोर्टलवर काही गावांची नावे उपलब्ध होत नसली तरी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा हप्ते बॅंकांनी भरून घ्यावेत, अशा सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. 

मंगळवारी दुपारपर्यंत राज्यातील ७६ लाख शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले होते. रात्री बारा वाजेपर्यंत हा आकडा ८० लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.  बुधवारपासून विमा तपशील भरण्याची सुविधा पोर्टलवर आता फक्त बँक व जिल्हा सहकारी बँकांकरिताच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

‘‘पोर्टलवर काही गावांची नावे उपलब्ध होत नाहीत. मात्र, बॅंकांनी अशा गावांमधील शेतकऱ्यांचा विमाहप्ता भरून घेणे नाकारू नये. शासनाने त्या गावांचे महसूल मंडळ अधिसूचित केलेली असतील तर अशा गावांतील शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकांनी स्वीकारावा. मान्यता दिलेल्या तारखांनुसार विमा प्रस्ताव तयार करून बॅंकांकडून विमा कंपनीकडे पाठवता येतील,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

विम्यासाठी नोंदणी करण्याकरता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै अंतिम मुदत होती. त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्र, बँक, विमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी यांच्या मदतीने शेतकरी मंगळवारी दिवसभर अर्ज भरण्यात व्यस्त होते. त्यामुळे सर्व्हरवरील ताणदेखील वाढलेला होता. बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज आपले सरकार सेवा केंद्र व विमा कंपन्या केवळ मंगळवारच्या रात्री १२ वाजेपर्यंत पोर्टलवर अपलोड केले जात होते. 

राष्ट्रीयकृत, व्यापारी व जिल्हा बँकांमार्फत शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आपला विमा हप्ता रोख, ऑनलाइन, डिमांड ड्रॉफ्टद्वारे रात्री बारापर्यंत बँकेकडे जमा करता करण्याची संधी होती. आजपासून (ता.१) ही सुविधा मात्र उपलब्ध नसेल. शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव आता ग्रामीण बँका, व्यावसायिक बँका, खासगी बँकांकडून विमा कंपनीकडे ९ ऑगस्टपर्यंत जातील. तसेच, प्राथमिक कृषी सहकारी संस्थांकडून जिल्हा सहकारी बँकांकडे ९ ऑगस्टला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...
मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी...परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक...
शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून...बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार...नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड...
लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्तीरुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी...
फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका:...पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर...
लष्करी अळीमुळे डेअरी, पोल्ट्रीला १३००...पुणे : राज्यातील डेअरी व पोल्ट्री उद्योगासाठी...
बाजार समित्यांतील रोख व्यवहारांवरील...नवी दिल्ली ः रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणून...
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...