agriculture news in marathi State government to Give Milk Powders to Amrut Ahar scheme | Agrowon

अमृत आहार योजनेंतर्गत मोफत दूध भुकटी देणार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने अमृत आहार योजनेंतर्गत राज्यातील तब्बल पावणेआठ लाख लहान बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना पुढील वर्षभर मोफत दूध भुकटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने अमृत आहार योजनेंतर्गत राज्यातील तब्बल पावणेआठ लाख लहान बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना पुढील वर्षभर मोफत दूध भुकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दररोज दहा लाख लीटर दुधाचे रूपांतरण भुकटीत करण्याच्या योजनेला सुद्धा आणखी एक महिना म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

राज्यात दूध दरवाढीवरून राजकारण तापले आहे. दुधाच्या दर वाढीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी नुकतेच आंदोलन केले होते.  यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. ५) बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव संजय कुमार, विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, महानंदचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.  

बैठकीत दूध दराच्या मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात मोठ्या प्रमाणावर दूध भुकटी शिल्लक आहे. या शिल्लक भुकटीचा प्रश्न मार्गी लावल्यास दूध दराचा मुद्दा निकाली निघेल असा सूर बैठकीत व्यक्त झाला. याआधीच्या दोन बैठकांमध्ये अमृत आहार योजनेअंतर्गत लहान बालके आणि स्तनदा माता, गरोदर महिलांना दूध भुकटी देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. सध्या बाजारात भुकटीचे दर घसरले आहेत. नुकसान सोसून भुकटीची विक्री करण्याऐवजी योजनेअंतर्गत भुकटी मोफत दिल्यास योग्य होईल असे मत मांडण्यात आले. त्यानुसार दूध भुकटी पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील ६ लाख ५१ हजार मुलांना आणि १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. अमृत आहार योजनेअंतर्गत इतर आहारासोबतच दूध भुकटी मोफत दिली जाणार आहे. ही योजना पुढील वर्षभर राबविण्यात येणार असून त्यापोटी १२१ कोटी इतका खर्च राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. साधारण पाच हजार मेट्रिक टन दूध भुकटीचा वापर योजनेअंतर्गत होईल असे सांगण्यात आले. 

तसेच कोरोनाच्या काळात राज्यातील दुधाच्या मागणीत मोठी घट झाल्यामुळे राज्य सरकारने टाळेबंदीच्या काळात अतिरिक्त दुधाचे रूपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना राबविली होती. दोनवेळा मुदतवाढ देत ही योजना ३१ जुलैपर्यंत राबविण्यात आली. चार महिने दररोज १० लाख लीटर दुधाचे रूपांतरण दूध भुकटीत करण्यात आले. त्यापोटी १९० कोटी इतका निधी खर्च होणार आहे. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी या योजनेला आणखी एक महिना म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. 

या दोन्ही निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी तत्त्वतः मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 


इतर अॅग्रो विशेष
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...