Agriculture news in Marathi State government responsible for cotton chaos: Hansraj Ahir | Agrowon

कापूस खरेदीतील अनागोंदीला राज्य सरकार जबाबदार ः हंसराज अहिर 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

चंद्रपूर ः राज्यात कापूस उत्पादकांची दराअभावी लूट होत आहे. शासकीय खरेदीतही गोंधळ असल्याने संपूर्ण कापूस खरेदीला अनेक महिने लागतील, या साऱ्या स्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला आहे. 

चंद्रपूर ः राज्यात कापूस उत्पादकांची दराअभावी लूट होत आहे. शासकीय खरेदीतही गोंधळ असल्याने संपूर्ण कापूस खरेदीला अनेक महिने लागतील, या साऱ्या स्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला आहे. 

सीसीआयने कापूस खरेदीसाठी वारंवार पत्र दिले. सीसीआयकडूनच कापूस खरेदीची पूर्वतयारी करण्यात आली. ग्रेडरही उपलब्ध केले गेले. मात्र, त्यानंतरही स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून आवश्‍यक बाबींची उपलब्धता करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले. एका केंद्रावर ठरावीक वाहन संख्येतच कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील कापूस घेण्यालाच अनेक महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या उदासीनतेमुळे पैशाची गरज असलेले शेतकरी व्यापाऱ्यांना आपला माल विकून मोकळे होत आहेत. व्यापारी या संधीचा फायदा उचलत हमीभावापेक्षा एक हजार ते १५०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. सीसीआयच्या कापूस केंद्रावर आजवर चार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सद्यःस्थितीत एका दिवशी दहा ते पंधरा गाड्यांमधील कापूस खरेदी केला जात आहे. परिणामी कापूस खरेदीची गती वाढवावी, त्याकरिता नवे केंद्र सुरू करावे, अशी मागणी श्री. अहिर यांनी केली. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...