राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : मुंडे

बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे मोठे नुकसान केले. पिकविम्यासह या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे,’’ असा विश्वास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला.
State Government strongly supports farmers: Munde
State Government strongly supports farmers: Munde

बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे मोठे नुकसान केले. पिकविम्यासह या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे,’’ असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला.

मुंडे यांनी रविवारी (ता.१८) गेवराई तालुक्यातील हिरापूर, इटकुर, मादळमोही, मिरकाळा, नंदपूर, माजलगाव तालुक्यातील तालखेड-धर्मेवाडी, श्रृंगारवाडी, फुले पिंपळगाव वडवणी तालुक्यातील पुसरा आणि मोरवड आदी गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

मुंडे यांच्यासह विविध ठिकाणी, आमदार प्रकाश सोळंके. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पंडित, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, महसूल, कृषी आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांना धीर देण्याची भूमिका मुंडे यांनी घेतली. फुले पिंपळगाव येथील शेतकरी शेख शब्बीर शमशोद्दिन यांच्या चार एकर शेतातील सोयाबीनचे क्षेत्र यामुळे वाया गेल्याचे दिसून आले.  

मुंडे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांकडून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शासनस्तरावरून यापूर्वी पंचनामे झाले आहेत. परंतु, सरकार म्हणून या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल. अंतरपिकांचाही समावेश पंचनाम्यांमध्ये करावा.’’ 

मिरकाळा ता. गेवराई येथे एक वृद्ध दाम्पत्य म्हणाले, ‘‘आम्ही चार धाम केले, अनेक वर्ष वाऱ्या करत आहोत. निसर्गाने आमच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला.’’

मुंडे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात १७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पिकविमा भरला आहे. झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला देण्यासाठी अद्ययावत अँप निर्माण केले आहे. त्याचबरोबरीने विमा कंपनीने कृषी विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत. याबाबत येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करणार आहे.’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com