राज्य शासनाच्या कृषी, बचत गट योजना येणार : पाटील

राज्य शासनाच्या कृषी, बचत गट योजना येणार : पाटील
राज्य शासनाच्या कृषी, बचत गट योजना येणार : पाटील

इस्लामपूर, जि. सांगली : आगामी काळात केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी आणि बचत गटविषयक अनेक योजना येत आहेत. महिलांनी खाद्यपदार्थांमध्ये अडकून न राहता बाजारपेठेत जास्त मागणी असणाऱ्या वस्तू बनवाव्यात. त्यासाठी सरकार पैसे द्यायला तयार आहे, त्याचा फायदा घ्या, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित सांगली जिल्हा कृषी महोत्सव व दख्खन जत्रेच्या उद् घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, वनश्री नानासाहेब महाडिक, नगरसेवक विक्रम पाटील, महिला बालकल्याण सभापती सुषमा नायकवडी, सी. बी. पाटील, वैभव शिंदे, राहुल महाडिक, भगवानराव साळुंखे, गौरव नायकवडी, दि. बा. पाटील, सागर खोत उपस्थित होते.

यल्लम्मा स्वयंसहायता समूह पाटगाव (मिरज), शिवकृपा स्वयंसहायता समूह, कोगनोळी (कवठेमहांकाळ) अंबिका स्वयंसहायता समूह, रामानंदनगर (पलूस) यांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रवीण शिंदे, पुष्पवती पाटील यांनाही पुरस्कार मिळाला.

पाटील म्हणाले, "शेतकरी श्रीमंत व्हायचा असेल, तर जगात नवीन काय चालले आहे, हे समजून घेतले पाहिजे. परंपरागत शेतीत आता फायदा नाही. २ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना आम्ही तीन आठवडे प्रशिक्षण देणार आहोत. गटशेती करणाऱ्यांना आम्ही एक कोटी देतोय. ४८ हजार ग्रामीण तरुणांना डेअरी व विविध प्रक्रिया केंद्रे यांचे सहा महिन्यांचे मोफत मार्गदर्शन देत आहोत. दोन हजार ठिकाणी हवामान केंद्रे आहेत, यातून शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती दिली जात आहे.``

खोत म्हणाले, "हातकणंगले मतदारसंघात पाणी योजनांसाठी २७५ कोटी रुपये आणले. कृषी महाविद्यालयाला ५० कोटी मंजूर आहेत, त्याचे फेब्रुवारीत भूमिपूजन होईल. जिल्ह्यात प्रथमच निर्यात सुविधा केंद्र होत आहे. १८० देशात कृषी माल निर्यात होतोय." 

संग्रामसिंह देशमुख म्हणाले, "सरकारने शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा दिला. प्रदर्शनामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. महिला बचत गटासाठी चांगला व्यवसाय दिल्यास त्या राज्यात आदर्शवत काम करून दाखवतील." 

दैनिक 'सकाळ'च्या कृषिविषयक 'ॲग्रोवन' दैनिकाचे चंद्रकांतदादा पाटील यांनी कौतुक केले. ते म्हणाले, "हे दैनिक प्रत्येकाने वाचले पाहिजे. त्यातील यशोगाथा प्रेरणादायी आहेत. इतरत्र शोकांतिका येतात, मात्र हे दैनिक यशोगाथा मांडून शेतकऱ्यांना दिशा देत आहे."

जिल्हाधिकाऱ्यांचा पेरू जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी पिकवलेला पेरू दाखवत चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "हा पेरू उसापेक्षा जास्त उत्पन्न देणारा आहे. वर्षाला एकरात सहा लाख रुपये मिळू शकतात, असा त्यांचा दावा आहे. असे नवे प्रयोग शेतकऱ्यांनी केले पाहिजेत"  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com